RR vs CSK IPL 2023: बुधवारी चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) पराभव झाला. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नईचा 3 रन्सने पराभव केला. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि एम एस धोनी (MS Dhoni) असताना देखील चेन्नईला विजय मिळवता आला नाही. राजस्थान रॉयल्सने चेन्नईला 176 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र 20 ओव्हर्समध्ये चेन्नईला 172 रन्सच करता आले. मात्र चेन्नई फलंदाजी करत असताना एक गोंधळ झालेला दिसला.
राजस्थान विरूद्धच्या सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने शॉर्ट पण स्विट खेळी केली. यावेळी त्याने 19 बॉल्समध्ये 31 रन्सची खेळी खेळली. मात्र यावेळी रहाणे फलंदाजी करत असताना त्याने घेतलेल्या रिव्ह्यूमुळे गोलंदाज एडम झम्पा (Adam Zampa) काहीसा नाराज झाला. इतकंच नाही तर त्याने अंपायरशी शाब्दिक बाचाबाची देखील केली. झम्पाने केलेली ही गोष्ट कॅमेरात मात्र कैद झालीये.
चेन्नई फलंदाजी करत असताना 9 वी ओव्हर सुरु होती. यावेळी गोलंदाजी एडम झम्पा (Adam Zampa) करत होता. या ओव्हरचा सहावा बॉल त्याने लेग साईडला फेकला. या बॉलवरून झम्पाने ऑनफील्ड अंपायरशी शाब्दिक बाचाबाची केली. त्याच्या या बाचाबाचीवरून अंपायर देखील काहीसे नाराज झालेले दिसून आले. या दृश्यामुळे खेळाच्या भावना दुखावल्या गेल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
झम्पाच्या ओव्हरचा शेवटच्या बॉलवर अजिंक्य रहाणे क्रिजवर होता. झम्पाने लेग साईडला फेकलेल्या या बॉलला अंपायरने लीगल बॉल डिलीव्हरीचा करार दिला. मात्र रहाणेने यावर आक्षेप घेतला. यावेळी रहाणेने डेवोन कॉन्वेसोबत चर्चा करून रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये असं दिसून आलं की, तो बॉल वाईड होता, ज्यामुळे अंपायरना त्यांचा जुना निर्णय बदलावा लागला. दरम्यान रहाणेने घेतेलेला हा रिव्ह्यू चांगलाच फायदेशीर ठरला आहे.
अंपायरने त्यांच्या निर्णय बदलल्यानंतर झम्पा काहीसा नाराज झाला. यावेळी तो अंपायरला सवाल विचारण्यासाठी गेला. जिसका एक वीडियो अब वायरल हो रहा है। इसके बाद एडम जम्पा को एक गेंद फालतू डालने के लिए आना पड़ा या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये झम्पा अंपयारवर चांगलाच नाराज झालेला दिसून आला.
राजस्थान रॉयल्सच्या 176 रनस्चा लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेच्या फलंदाजांची चांगलीत दमछाक झाली. सीएसकेचा ओपनर डेव्हॉन कॉनवेने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीने 17 बॉल्समध्ये नाबाद 32 रन्स केले. याशिवाय रवींद्र जडेजाने 25 रन्स केले. मात्र या दोघांनाही सामना जिंकवून देण्यात यश आलं नाही.