मुंबई: IPL च्या दुसऱ्या टप्प्यातून हैदराबाद संघ बाहेर पडला आहे. आता प्ले ऑफच्या स्पर्धेसाठी राजस्थान, बंगळुरू, कोलकाता आणि मुंबई यांच्यात चढाओढ सुरू आहे. आज राजस्थान विरुद्ध बंगळुरू सामना रंगणार आहे. बंगळुरू संघाचे पॉईंट टेबलमध्ये 12 तर राजस्थानचे 8 पॉइंट आहेत. आता हा सामना दोन्ही संघांना प्ले ऑफच्या दृष्टीनं जिंकणं महत्त्वाचे आहे.
बंगळुरू विरुद्ध राजस्थान यांच्या यापूर्वीही अशी कडवी लढत पाहायला मिळाली होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये बंगळुरू विरुद्ध राजस्थान संघ 24 वेळा एकमेकांविरुद्ध समोर आला आहे. त्यापैकी 11 सामने बंगळुरू संघाने जिंकले आहेत. तर 10 सामने राजस्थान संघाने जिंकले आहेत. बंगळुरू संघाने 10 सामने गमवले आहेत. तर राजस्थान संघाला 11 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
संभाव्य प्लेइंग XI
राजस्थान रॉयल्स- एविन लुईस, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, महिपाल लोमरोर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस/तबरेज शम्सी, चेतन सकारिया, जयदेव उनादकट/शेयस गोपाल, मुस्तफिजुर रहमान
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, डेनियल ख्रिश्चियन, काइल जॅमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल
A must win game. Sanju vs Virat. Royals vs Royal Challengers.
All you need to know. #HallaBol | #IPL2021 | #RRvRCB
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 29, 2021
आतापर्यंत झालेल्या सामन्यात 10 पैकी बंगळुरू संघाने 5 वेळा टॉस जिंकला आहे आणि 5 वेळा टॉस जिंकण्यात अपयश आलं आहे. तर राजस्थान संघाने 6 वेळा टॉस जिंकला आहे. तर 4 वेळा टॉस जिंकण्यात अपयश आलं आहे.
बंगळुरूच्या शिलेदारांना हा सामना प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी जिंकणं महत्त्वाचं आहे. आता प्ले ऑफच्या रेसमध्ये दिल्ली आणि चेन्नई जाणार हे निश्चित आहे. मात्र आणखी कोणते दोन संघ जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.