नवी दिल्ली : रियाल माद्रीदकडून खेळणारा पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो याला सलग दुसऱ्यांदा सर्वश्रेष्ट खेळाडू म्हणून 'ग्लोब सॉकर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एकूण फुटबॉल कारकिर्दीत रोनाल्डोला हा पुरस्कार चौथ्यांदा मिळाला आहे. मात्र, हा पुरस्कार त्याला सलग पहिल्यांदाच मिळाला आहे.
दरम्यान, हा पुरस्कार स्विकारण्यासाठी रोनाल्डो उपस्थित नव्हता. युरोपीय असोशिएशन ऑफ फुटबॉल एजेंट्स (इएफएए) आणि युरोपी क्लब्स असोशिएशन (इसीए) द्वारा दिला जाणारा हा पुरस्कार रोनाल्डोला 2011, 2014 आणि 2016मध्येही मिळाला होता. आपल्या आयुष्यात अनेक पुरस्कार पटकावलेल्या रोनोल्डोने पुरस्कार मिळाल्यावर प्रतिक्रीया देताना म्हटले की, आपल्याकडे आणखीही पुरस्कार ठेवण्यासाठी जागा आहे.
गेल्या वर्षी रियाल मॅद्रीदला चॅम्पीयन बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या या खेळाडूने म्हटले की, मित्रांनो आपण अजिबात चिंता करू नका. माझ्याकडे अद्याप अजूनही खूप जागा आहे. ज्यात अनेक पुरस्कार मावतील. मला मिळत असलेल्या या सन्मानामुळे मी प्रचंड खूष आहे. आपले प्रेम असेच राहू द्या. खरे तर, हा पुरस्कार मला अनेकदा मिळाला आहे. पण, तरीही मी त्या लोकांचे आभार मानतो. ज्यांनी मला हा पुरस्कार मिळावा म्हणून मतदान केले.