Rohit Sharma: मुंबई इंडियन्स नाही तर 'या' टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला रोहित; Video व्हायरल झाल्याने खळबळ

Rohit Sharma: यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स अनेक बदलांसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या टीमचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलंय. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 12, 2024, 06:43 PM IST
Rohit Sharma: मुंबई इंडियन्स नाही तर 'या' टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला रोहित; Video व्हायरल झाल्याने खळबळ title=

Rohit Sharma: येत्या 22 तारखेपासून आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम मानली जाते. मात्र यंदाच्या वेळी मुंबई इंडियन्सचे चाहते मॅनेजमेंटवर नाराज आहेत. याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पंड्याला कर्णधार केलं. या निर्णयामुळे चाहते मात्र नाराज आहेत. दरम्यान आयपीएल आता सुरु होणार असून इंग्लंडची सिरीज जिंकून रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये पोहोचलाय. मात्र ही ड्रेसिंग रूम मुंबई इंडियन्सची नसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स अनेक बदलांसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या टीमचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवलंय. मात्र रोहित शर्मा अद्याप मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये पोहोचला नाहीये. या उलट तो दुसऱ्या टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये स्पॉट केला आहे.

कोणत्या टीमच्या ड्रेसिंगमध्ये पोहोचला होता रोहित?

रोहित शर्मा आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये कधी सामिल होणार याबाबत सर्वांच्या मनात प्रश्न आहे. दरम्यान कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यावेळी रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिसला आहे. मुंबई आणि विदर्भ यांच्यात होणारा सामना पाहण्यासाठी तो आला होता. यादरम्यान तो वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीसोबत मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये बसलेला दिसला. हा रणजी ट्रॉफीचा फायनल सामना वानखेडे मैदानावर सुरु आहे. यावेळी रोहितचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. 

सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक रोहित

रोहित शर्माने 2013 साली आयपीएलमध्ये कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. कर्णधार म्हणून त्याने आयपीएलच्या पहिल्याच सिझनमध्ये ट्रॉफी जिंकली होती. यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आपल्या टीमला चॅम्पियन बनवले. असं असूनही रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्यात आलं.

हार्दिकची मुंबई इंडियन्सच्या कॅम्पममध्ये अनोखी एन्ट्री

हार्दिक पांड्या नुकताच मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत जोडला गेला आहे. त्याने टीमच्या कॅम्पमध्ये एन्ट्री करताच मुंबईचे हेड कोच मार्क बाउचर यांनी हार्दिकला घट्ट मिठी मारली आणि त्याचं जंगी स्वागत केलं. यानंतर हार्दिकने सर्वात आधी देवाचे आशिर्वाद घेतले यासोबतच मुंबईचे हेड कोच मार्क बाउचर यांनीदेखील देवासमोर नारळ फोडत देवाच्या पाया पडले. मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पांड्याच्या हाती सोपवण्यात आलेली आहे.  हार्दिकने मागील दोन वर्ष गुजरात टायटन्सटचे प्रतिनिधीत्व केले होते, पण या वर्षी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून 15 कोटीमध्ये ट्रेड केले होते.