IPL 2024 मध्ये रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? MI कडून केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार?

Rohit Sharma : काही मिडीया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आयपीएल 2024 ( IPL 2024 ) च्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jan 11, 2024, 10:55 AM IST
IPL 2024 मध्ये रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय? MI कडून केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार? title=

Rohit Sharma : मार्च महिन्यात आयपीएलच्या ( IPL 2024 ) पुढच्या सिझनला सुरुवात होणार आहे. या सिझनपूर्वी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात फार मोठ्या घडामोडी घडल्या. मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वी गुजरात टायटन्ससोबत करार करून हार्दिक पंड्याला टीममध्ये घेतलं आणि कर्णधारपदाची माळ देखील त्याच्या गळ्यात घातली. यानंतर रोहित शर्माचे ( Rohit Sharma ) चाहते मात्र संतापले. अशातच आता रोहित शर्माबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

काही मिडीया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आयपीएल 2024 ( IPL 2024 ) च्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) केवळ इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. आयपीएल 2023 च्या सिझनमध्ये हा नवा नियम लागू करण्यात आला होता.

रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय?

मुंबई इंडियन्ससाठी ( Mumbai Indians ) रोहित शर्मा गेल्या 11 आयपीएल सिझनमध्ये टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians ) 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलंय. परंतु आयपीएल 2024 चा सिझन सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) टीम मॅनेजमेंटने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्याला नवा कर्णधार घोषित केलं. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians ) कर्णधार बनल्याने टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खूपच निराश झालाय. रोहित शर्मा आयपीएल 2024 च्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळताना दिसू शकतो.

आयपीएल 2023 मध्येही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरला होता रोहित 

IPL 2023 च्या सिझनमध्ये प्रथमच IPL क्रिकेटमध्ये  इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आला होता. या नियमाच्या मदतीने आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) यांच्यातील सामन्यात रोहित शर्माऐवजी सूर्यकुमार यादवच्या हाती टीमचं नेतृत्व देण्यात आलं होतं. त्यावेळी माजी कर्णधार रोहित शर्मा केवळ फलंदाजीसाठी उतरला होता.