मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे दोन दावेदार समोर आले आहेत. तर कॅप्टन्सीमुळे रोहित शर्माच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचंही दिसत आहे. रोहित शर्मा येत्या काळात कॅप्टन्सी सोडू शकतो अशी चर्चा आहे.
रोहित शर्माचं कॅप्टन्सीवरील वर्चस्व फार काळ टिकू शकणार नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. रोहित शर्माला सध्या टीम इंडियातले दोन खेळाडू टफ देत आहेत. त्यामुळे त्यांचाही विचार कॅप्टन्सीसाठी केला जाणाच्या शक्यता आहे. जर या दोन दावेदारांचा विचार केला तर रोहित शर्माला कॅप्टन्सीपद सोडावं लागू शकतं अशीही एक चर्चा आहे.
1. के एल राहुल
आयपीएलमध्ये लखनऊ टीमचं कर्णधारपद कशा पद्धतीनं के एल राहुलने सांभाळलं ते संपूर्ण जगानं पाहिलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी तो मोठा दावेदार मानला जात आहे. आयपीएल आणि वन डेमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली आहे. पुढचा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणार आहे. जो कोविड-19 महामारीमुळे 2020 मध्ये पुढे ढकलण्यात आला होता.
भारत 2023 मध्ये वन डे वर्ल्डकपचं यजमानपद भूषवणार आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलकडे पुढचा कॅप्टन म्हणून पाहिलं जाऊ शकतं. केएल राहुल हा एक उत्कृष्ट विकेटकीपर आणि फलंदाज आहे.
2. हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्यामध्ये टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होण्याची क्षमता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये हार्दिक पांड्याने टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच टीम इंडियातील त्याचे स्थान निश्चित झाले आहे.
हार्दिक पांड्याकडे कौशल्य आहे आणि मिडल ऑर्डरचा तो आधार आहे. हार्दिक पांड्यामध्ये कर्णधार बनण्याचे सर्व गुण आहेत. IPL 2022 मध्ये हार्दिक पंड्याने यावर्षी गुजरात टायटन्ससाठी ट्रॉफी देखील जिंकवून दिली होती.