रोहित शर्माने विराट -अनुष्काला लग्नानंतर दिला 'हा' खास सल्ला

अखेर इटलीमध्ये सोमवारी 'विरूष्का' विवाहबंधनात अडकल्याची अधिकृत घोषणा झाली. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Dec 12, 2017, 05:23 PM IST
रोहित शर्माने विराट -अनुष्काला लग्नानंतर दिला 'हा' खास सल्ला  title=

मुंबई : अखेर इटलीमध्ये सोमवारी 'विरूष्का' विवाहबंधनात अडकल्याची अधिकृत घोषणा झाली. 

ट्विटरच्या माध्यामातून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आयुष्यभरासाठी आम्ही पवित्र बंधनात अडकत असल्याची माहिती चाहत्यांना दिली.  

शुभेच्छांचा वर्षाव  

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाची माहिती आणि शाही सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या तमाम चाहत्यांनी 'विरूष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.  

सेलिब्रिटींचा वर्षाव  

अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, काजोल,सलमान खान  यांच्यासह तमाम बॉलिवूडने विरूष्काला  लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.  

बॉलिवूडकरांसोबतच क्रिकेटर्स आणि खेळ जगतातील काही दिग्गजांनी देखील विराट कोहली आणि अनुष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळेस विराटचा सहकारी रोहित शर्मानेदेखील त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देताना एक खास मंत्रही दिला आहे. 

रोहित शर्माचा सल्ला काय ? 

 

रोहित शर्माने विराटला 'हजबंड हॅन्डबुक' देण्याचा  तर अनुष्काला तिचं आडनाव न बदलण्याचा सल्ला दिला आहे.