रोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी? पाकिस्तान कनेक्शन समोर; 'त्या' फोटोने वाद

Rohit Sharma Sacked As India Captain? सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील एक आश्चर्यकारक फोटो व्हायरल झाला असून मालिकेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधीच नवीन वादाला तोंड फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 11, 2024, 10:59 AM IST
रोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी? पाकिस्तान कनेक्शन समोर; 'त्या' फोटोने वाद title=
सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Rohit Sharma Sacked As India Captain? : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पर्थ येथे होणाऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ टप्प्याटप्प्यात रवाना होत आहे. मात्र असं असतानाच बॉर्डर-गावसकर चषकाच्या संपूर्ण स्पर्धेसाठी रोहित शर्माला डच्चू देण्यात आला आहे की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. यामागील कारण ठरलं आहे, ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमं!

नेमकं घडलं काय?

झालं असं की, फॉक्स क्रिकेट वाहिनीवरुन ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावसकर चषक मालिका लाइव्ह दाखवली जाणार आहे. मात्र याच वाहिनीवरील एका फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ गातला आहे. रविवारी पर्थच्या मैदानावर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान फॉक्स क्रिकेट वाहिनीवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेचा तपशील दाखवण्यात आला. मात्र या इन्फोग्राफिकमध्ये भारताचा कर्णधार म्हणून रोहित शर्माऐवजी विराट कोहलीचा फोटो दाखवण्यात आला आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि दुसरीकडे विराट कोहली असा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि संपूर्ण मालिकेसाठी रोहित शर्माला डच्चू देण्यात आला आहे की काय अशी चर्चा सुरु झाली. 

...म्हणून झळकला विराट?

आता विराट कोहलीचा फोटो का दाखवण्यात आला याबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात असतानाच विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धची दमदार कामगिरी यासाठी कारणीभूत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेल्या मागील 13 सामन्यांमध्ये विराट कोहलीने 1352 धावा केल्या असून त्याची धावांची सरासरी 54 इतकी राहिली आहे. विराटने एकूण 6 शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली आहेत. 2014-15 च्या दौऱ्यात विराटने 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या. धोनीने अचानक कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असलेली ही पहिलीच कसोटी मालिका होती.

फोटो झाला व्हायरल

सोशल माडियावर रविवारी फॉक्स क्रिकेट वाहिनीने दाखवलेल्या माहितीचा फोटा व्हायरल होत आहे. 

मजेदार प्रतिक्रिया

यावर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात... 

1) आधीच विराटला दिला डच्चू

2) नव्या वादाला फुटलं तोंड

3) कर्णधाराचा अपमान

4) मवा विश्वासच बसत नाहीये

असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 

पहिली कसोटी - 22 ते 26 नोव्हेंबर (पर्थ)
दुसरी कसोटी - 6 ते 10 डिसेंबर (अॅडलेड)
तिसरी कसोटी - 14 ते 18 डिसेंबर (ब्रिस्बेन) 
चौथी कसोटी - 26 ते 30 डिसेंबर (मेलबर्न)
पाचवी कसोटी - 3 ते 7 जानेवारी (सिडनी)