Rohit Sharma : रोहितची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णय तोडणार WTC जिंकण्याचं स्वप्न

Rohit Sharma :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांची कांगारूंकडून ( AUS vs IND ) धुलाई झालीये. यावेळी कर्णधार रोहित शर्माचा एक निर्णय चुकला असल्याचं म्हटलं जातंय. 

Updated: Jun 8, 2023, 07:19 PM IST
Rohit Sharma : रोहितची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णय तोडणार WTC जिंकण्याचं स्वप्न title=

Rohit Sharma : बुधवारपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना सुरु आहे. या सामन्याचा आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असून दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या ( Team India ) गोलंदाजांचं टीमवर अधिक वर्चस्व दिसून आलं. मात्र सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांची कांगारूंकडून ( AUS vs IND ) धुलाई झालीये. यावेळी कर्णधार रोहित शर्माचा एक निर्णय चुकला असल्याचं म्हटलं जातंय. 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. पहिल्या दिवशी कांगारू खेळाडू स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने उत्तम खेळ करत 85 ओव्हर्समध्ये 327 रन्स केले. दर आज दुसऱ्या दिवशी कांगारूंची संपूर्ण टीम 469 रन्सवर माघारी परतली. 

ऑस्ट्रेलियची टीम ऑलआऊट

ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 रन्स केले. यामध्ये ट्रेविस हेडने सर्वाधिक 163 रन्सची खेळी केली. हेडला स्टिव्ह स्मिथने यावेळी उत्तम साथ दिली. स्टीव्ह स्मिथने देखील 121 रन्सची खेळी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 285 रन्सची पार्टनरशिप केली. 

दुसरीकजे अॅलेक्स कॅरीने 48 आणि डेव्हिड वॉर्नरने 43 रन्स केले. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या आहेत.

रोहित शर्माची एक चूक पडली महागात

या सामन्यामध्ये रोहित शर्माने ( Rohit Sharma ) सर्वोत्तम स्पिनर रविचंद्रन अश्विनचा समावेश केला नाही. आणि हीच रोहित शर्माची ( Rohit Sharma ) मोठी चूक झाली. अश्विनचा रेकॉर्ड पाहिला तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध फार चांगला आहे. अश्विनने 42 डावांमध्ये 114 विकेट्स काढले आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी अशी परिस्थिती उपस्थित झाली होती की, भारतीय गोलंदाजांना विकेट्स मिळत नव्हती. अशावेळी अश्विन त्या ठिकाणी विकेट मिळवू शकला असता. 

जडेजाने आतापर्यंत 31 डावांमध्ये 8 विकेट्स काढले आहेत. त्यामुळे जडेजाच्या जागी अश्विनला टीममध्ये घेणं फायदेशीर ठरलं असतं. यावेळी रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) हा निर्णय कुठेतरी चुकला असल्याचं म्हटलं जातंय.