गळ्यात पचास तोला आणि राजकारणी लूक...; Rohit sharma क्रिकेट सोडणार?

तुम्ही रोहित शर्माला सिंपल आणि सोबर लूकमध्ये पाहिलं असेल. रितीकाच्या भावाच्या लग्नात देखील रोहितने भरजरी कपडे घालते नव्हते.

Updated: Apr 13, 2023, 07:58 PM IST
गळ्यात पचास तोला आणि राजकारणी लूक...; Rohit sharma क्रिकेट सोडणार? title=

Rohit Sharma new look : सध्या देशभर आयपीएलचे (IPL 2023) वारे वाहत असून क्रिकेट प्रेमी (Cricket fans) त्यांच्या आवडत्या टीमला सपोर्ट करतायत. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय टीम म्हणली की, ती म्हणजे मुंबई इंडियन्स (Mumbai indians). तब्बल 5 वेळा विजेचेपद पटकावणारी टीम मुंबई इंडियन्स अनेक चाहते आहे. नुकतंच या टीमने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव करत यंदाच्या आयपीएलमध्ये विजयाची नोंद केली. मात्र आता मुंबईच्या चाहत्यांना टीमच्या कर्णधाराचा नवा लूक पाहून धक्का बसण्याची शक्यता आहे. 

रोहित शर्माचा (Rohit Sharma) नवा लूक व्हायरल

यापूर्वी तुम्ही रोहित शर्माला सिंपल आणि सोबर लूकमध्ये पाहिलं असेल. रितीकाच्या भावाच्या लग्नात देखील रोहितने भरजरी कपडे घालते नव्हते. मात्र आता व्हायरल झालेल्या या लूकमध्ये रोहितच्या गळ्यात 2 सोन्याच्या जाड चैन, हातात सोन्याचं ब्रेसलेट दिसंतय. याशिवाय त्याने अगदी राजकारण्यांप्रमाणे कपडे घातलेले पहायला मिळतंय. दरम्यान या लूकनंतर रोहित शर्मा राजकारणात एन्ट्री करतोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

रोहितने पोस्ट केला नव्या लूकचा व्हिडीओ

रोहित शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा लूक पोस्ट केला आहे. इतकंच नाही तर या व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यर ड्रायव्हरच्या तर शुभमन गिल रोहितच्या सेक्रेटरीच्या भूमिकेत दिसतोय. या तिन्ही खेळाडूंचा हा नवा लूक एका अॅडव्हरटाईजच्या शूटसाठी आहेत. यावेळी तिघांनीही या शूटवेळी भरपूर धमाल केल्याचं दिसतंय.

मुंबईचा पहिला विजय

दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करत यंदाच्या सिझनमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईने तब्बल 6 विकेट्सने दिल्लीचा पराभव केला आहे. यावेळी रोहित शर्माच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईने हा विजय मिळवला होता. 

रोहित शर्माची तुफान खेळी

दिल्ली विरूद्ध मुंबईच्या सामन्यात रोहित शर्माने कॅप्टन्स इंनिंग खेळली. रोहितने 45 बॉल्समध्ये हिटमॅनने 65 रन्सची केली. यामध्ये 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता. काही दिवसांपासून रोहितवर खराब फॉर्ममुळे टीका करण्यात येत होती. मात्र दिल्ली विरूद्धच्या सामन्यात अखेर रोहित शर्माची बॅट तळपली.