वर्ल्डकप महत्त्वाचा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे...; कर्णधार Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य!

टीम इंडिया सध्या 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. 

Updated: Oct 15, 2022, 02:29 PM IST
वर्ल्डकप महत्त्वाचा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे...; कर्णधार Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य! title=

मेलबर्न : टीम इंडिया सध्या 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे. टीमसाठी एक वाईट बातमी म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टीमबाहेर गेला. मुळात टीम इंडियासाठी हा खूप मोठा धक्का होता. मात्र त्यानंतर बुमराहऐवजी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला वर्ल्डपसाठी टीममध्ये सिलेक्शन करण्यात आलं आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने आज वर्ल्डकपपूर्वी पत्रकार परिषदेत बुमराह आणि शमीबद्दल भाष्य केलं. यादरम्यान रोहितने बुमराहबद्दल एक अशी गोष्ट सांगितली ज्याने सर्वांचं मन जिंकून घेतलं. 

रोहित म्हणाला की, वर्ल्डकप आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मात्र पण बुमराह आमच्यासाठी त्यापेक्षाही महत्त्वाचा आहे. त्याच्याबाबतीत कोणतीही रिक्स घेऊ शकत नाही.

बुमराहसंदर्भात बोलताना रोहित म्हणाला, "बुमराह एक चांगला गोलंदाज आहे. मात्र दुर्दैवाने दुखापती या होतच राहतात. दुखापतींना आपण काहीही करू शकत नाही. त्यांच्या दुखापतीबद्दल आम्ही तज्ज्ञांशी बोललो, पण चांगला प्रतिसाद मिळाला नाही."

वर्ल्डकप आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, पण बुमराहची कारकीर्द देखील आमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या तो फक्त 27-28 वर्षांचा आहे. त्याच्या पुढे मोठी कारकीर्द आहे. त्यामुळे आम्ही अशी जोखीम घेऊ शकत नाही. आम्ही त्याला स्पर्धेत नक्कीच मीस करू, असंही रोहितने सांगितलंय.

भारत विरूद्ध पाकिस्तान

टी 20 वर्ल्डकप सुरु होण्यासाठी अवघ्या एका दिवसाचा अवधी उरला आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला असून भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणार आहे. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघातील खेळाडूंचा फॉर्म बघितला तर यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेतील प्रबल दावेदार मानला जात आहे.