रोहितने या खास दिवशी ठोकली डबल सेंच्युरी

  भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार डबल सेंच्युरी ठोकली आहे.

Updated: Dec 13, 2017, 03:27 PM IST
रोहितने या खास दिवशी ठोकली डबल सेंच्युरी title=

मोहाली :  भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार डबल सेंच्युरी ठोकली आहे.

रोहितसाठी खास दिवस

रोहितच्या वनडे करिअरमधली ही १६ वी सेंच्युरी आहे. रोहितचं हे डबल शतक खूप खास आहे. कारण आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी २ वर्षापूर्वी त्याने रितिका सजदेह सोबत विवाह केला होता. रोहितच्या या डबल सेंच्युरीमुळे भारताचा स्कोर ३९२ रनवर पोहोचला आहे. टीम इंडिया यामुळे भक्कम स्थितीत पोहचली आहे.

कर्णधार म्हणून पहिली सेंच्युरी

कर्णधार म्हणून ही त्याची पहिली सेंच्युरी आणि नंतर डबल सेच्युरी ठरली आहे. या सीरीजमध्ये विराच कोहलीला लग्नामुळे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय टीमचं कर्णधारपद रोहितला सोपवलं आहे. धर्मशालामध्ये पहिल्या वनडेत फ्लॉप ठरल्यानंतर रोहितने गी कसर दुसऱ्या वनडेमध्ये भरुन काढली आहे.