मुंबई : मुंबई इंडियन्सची आयपीएल-2021मध्ये चांगली सुरुवात झाली नाही. हंगामाच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्यांचा पराभव झाला होता. परंतु पाच वेळा आयपीएलमध्ये विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सने मॅचमध्ये पुनरागमन केले आणि सलग दोन सामन्यांत विजयी झाला. शनिवारी मुंबईने सनरायझर्स हैदराबादला 13 धावांनी पराभूत केले. या सामन्यात मुंबईचे फलंदाज तसे फारसे प्रभावी ठरले नाहीत आणि संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. परंतु मुंबई इंडियन्सच्या अनुभवी गोलंदाजीनी मात्र आपला खेळ दाखवला आणि मुंबई इंडियन्सच्या नावावर विजय नोंदवला.
सामन्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या संघाच्या गोलंदाजांवर फारच खूश आहे. परंतु त्याची फलंदाजांच्या खेळाबद्दल तक्रार आहे. संघातील फलंदाजांनी आपली जबाबदारी पार पाडावी अशी त्याची इच्छा आहे. मुंबईने सनरायझर्ससमोर 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याकरता पोलार्डने 22 चेंडूत नाबाद 35 धावा करून संघाला चांगली धावसंख्या मिळवून दिली. सनरायझर्सचा संघ 137 धावांवर बाद झाला. मुंबईकडून राहुल चाहर आणि ट्रेंन्ट बोल्ट यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले, तर जसप्रीत बुमराहने चार ओव्हरमध्ये 14 धावा देऊन एक गडी बाद केला.
सामन्यानंतर रोहितने त्याच्या गोलंदाजांच्या आक्रमणाचे कौतुक केले आणि म्हणाला, "गोलंदाजी युनिटीने शानदार प्रदर्शन केले. आम्हाला माहित होते की, हे सोपे नसणार, जेव्हा आपल्याकडे अशी पीच असते आणि गोलंदाज दिलेल्या नियोजनानुसार गोलंदाजी करतो, तेव्हा कर्णधार म्हणून तुमचं काम सोपं होते."
रोहित म्हणाला की, त्याच्या संघाने सुरवातीला चांगली धावसंख्या उभारली होती. पण त्यांनी मीडल ओव्हरमध्ये अधिक चांगली फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. रोहित म्हणाला, "मला वाटले की, या पीचवर ही धावसंख्या चांगली आहे. दोन्ही संघांनी पॉवरप्लेचा चांगला फायदा घेतला. आमची टीम मीडल ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करू शकतो. त्यांच्या संघात राशिद आणि मुजीबसारखे गोलंदाज आहेत, त्यांच्याविरुद्ध धावा करणे सोपे नव्हते. पीचवर वेग कमी होत चालला होता आणि या परिस्थितीत फिरकी किंवा वेगवान गोलंदाजांविरुद्ध रन्स करणे सोपे नव्हते."
संघाचा अनुभवी फलंदाज पोलार्डने कर्णधार रोहितच्या चर्चेचे समर्थन केले आहे आणि तो म्हणाला की, संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये जलद धावा कराव्या लागतील. पोलार्डच्या खेळामुळे त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले. तो म्हणाला, "आम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक धावा करण्याचा मार्ग शोधावा लागेल.
आज मी काही अतिरिक्त धावा गोळा केल्या ज्यामुळे संघाला मदत झाली. अशा पीचवर, जर तुमच्याकडे खेळायला कमी बॉल असतील तर, अशा परिस्थितीत रन्स करणे कठीण होते. परंतु आम्ही अशा परिस्थितीमध्ये खेळण्याचा सराव करतो. अशाप्रकारच्या विजयामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मला माझे काम केल्याबद्दल आनंद आहे."
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या संघाचा दुसरा सामना खेळल्यानंतरही रोहितने फलंदाजी सुधारण्याचे बोलले होते आणि सांगितले की संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये वेगवान धावा करण्याची गरज आहे. केकेआरच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला, "शेवटच्या ओव्हरमध्ये आम्हाला सलग दुसऱ्यांदा धावा करता आल्या नाहीत. आम्हाला अधिक 15-20 रन्स करायला पाहिजे आहे. आम्हाला सामोरे जाण्यासाठी एक मार्ग शोधला पाहिजे."