...म्हणून Birthday ला पोलार्ड टीममध्ये नव्हता? रोहित शर्माचं धक्कादायक उत्तर

वाढदिवसालाच टीमबाहेर काढल्याने चाहत्यांनी टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्मावर टीका केली आहे.

Updated: May 13, 2022, 09:59 AM IST
...म्हणून Birthday ला पोलार्ड टीममध्ये नव्हता? रोहित शर्माचं धक्कादायक उत्तर title=

मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यात किरन पोलार्डचा मुंबईच्या टीममध्ये समावेश केला गेला नव्हता. महत्त्वाचं म्हणजे, काल किरन पोलार्डचा वाढदिवस असताना त्याला टीममधून बाहेर बसवलं.

दरम्यान वाढदिवसालाच टीमबाहेर काढल्याने चाहत्यांनी टीम मॅनेजमेंट आणि कर्णधार रोहित शर्मावर टीका केली आहे. अखेर यानंतर रोहित शर्माने यावर उत्तर दिलं आहे. 

रोहितने पोलार्डसंदर्भात केलं मोठं विधान

रोहित शर्मा म्हणाला, पोलार्ड सामना खेळण्यासाठी तयार होता. मात्र आम्ही काही इतर खेळाडूंना संधी देऊ इच्छित होतो. त्यांचा खेळ कसा आहे हे आम्हाला पाहायचं होतं. शिवाय त्यांनी खेळही चांगला केला.

दरम्यान काल किरण पोलार्डने त्याचा 35 वा वाढदिवस साजरा केला. मात्र कालच्या सामन्यात त्याचा समावेश केला गेला नव्हता. किरण पोलार्डचा आयपीएलच्या करियरमधील हा 13 वा सिझन आहे. 2010 साली ऑक्शनमध्ये खरेदी केल्यावर तो मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. दरम्यान 2022 च्या ऑक्शनपूर्वी मुंबईने त्याला 6 कोटी रूपयांना रिटेन केलं.