Rohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही...तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी

Rohit Sharma: ICC वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. वर्ल्डकपच्या दृष्टीने ही सिरीज फार महत्त्वाची मानली जातेय. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 28, 2023, 08:28 AM IST
Rohit Sharma: रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही...तर सिराजने 4 अनोळखी खेळाडूंच्या हाती सोपवली विजयाची ट्रॉफी title=

Rohit Sharma: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये 3 वनडे सामन्यांच्या सिरीजमधील शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा क्लिन स्विप देण्याची संधी होती. मात्र टीम इंडियाला तसं करणं शक्य झालं नाही. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 66 रन्सने पराभव केला आहे. दरम्यान सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. 

रोहित शर्माने दाखवला मनाचा मोठेपणा

ICC वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. वर्ल्डकपच्या दृष्टीने ही सिरीज फार महत्त्वाची मानली जातेय. यावेळी तिसरा सामना 27 सप्टेंबर रोजी खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाला 66 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, असं असतानाही भारताने मालिका जिंकली. कारण पहिले दोन सामने टीम इंडियाने जिंकले होते. 

दरम्यान यानंतर त्याचवेळी तिसरा सामना संपल्यानंतर नियमित कर्णधार रोहित शर्माला ट्रॉफी देण्यासाठी करण्यासाठी मैदानावर बोलावण्यात आलं होतं. मात्र यावेळी रोहित शर्माने ट्रॉफी न घेता केएल राहुलला ट्रॉफी दिली. दरम्यान रोहित शर्माच्या या कृत्याचं सर्व ठिकाणी कौतुक होताना दिसतंय. 

Team India ने खास पद्धतीने केलं सेलिब्रेशन

ट्रॉफी मिळाल्यानंतर केएल राहुलने मोहम्मद सिराजला ट्रॉफी दिली. यावेळी सिराजने त्याने ते सौराष्ट्र राज्याचे चार खेळाडू धर्मेंद्र जडेजा, प्रेरक मांकड, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई यांच्याकडे सोपवली. मोहम्मद सिराजच्याही या कृत्याचं कौतुक होताना दिसतंय. हे चार खेळाडू बीसीसीआयने संपूर्ण सामन्यादरम्यान ड्रिंक्स आणि फील्डिंगसाठी टीम इंडियाशी जोडले होते. संपूर्ण भारतीय टीम यावेळी चॅम्पियन्ससमोर उभा राहिली होती. टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

तिसऱ्या वनडेत टीम इंडियाचा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात (Australia Beat India in 3rd ODI) कांगारूंनी टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 352 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला प्रत्युत्तर देतना टीम इंडियाला फक्त 286 धावा करता आल्या. टीम इंडिया 50 ओव्हरच्या आतच ऑलआऊट झाली. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.