ट्रॅफिक पोलिसाला रोहित शर्माने दिलं खास गिफ्ट; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Rohit Sharma: फेमस डासिंग कॉपी नावाने प्रसिद्ध असलेले रणजीत शर्मा यांनी रोहित शर्माकडे त्याची ऑटोग्राफ मागितली होती. मात्र गेल्या वेळी त्यांना ऑटोग्राफ मिळणं शक्य झालं नाही.

सुरभि जगदीश | Updated: Jan 17, 2024, 03:47 PM IST
ट्रॅफिक पोलिसाला रोहित शर्माने दिलं खास गिफ्ट; पाहून तुम्हालाही बसेल धक्का title=

Rohit Sharma: भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. मुळात टीम इंडियाने ही 3 सामन्यांची टी-20 सिरीज दोन सामन्यांच विजय मिळवत जिंकली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया असणार आहे. अशातच तिसऱ्या सामन्यापूर्वी रोहित शर्माने एका स्थानिक ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला खूश केलं आहे.   

फेमस डासिंग कॉपी नावाने प्रसिद्ध असलेले रणजीत शर्मा यांनी रोहित शर्माकडे त्याची ऑटोग्राफ मागितली होती. मात्र गेल्या वेळी त्यांना ऑटोग्राफ मिळणं शक्य झालं नाही. यानंतर आता रोहित शर्माने स्पेशल नोट सोबत ऑटोग्राफ दिली आहे. याचा फोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय.

रणजीतने शेअर केली खास पोस्ट

रोहितने रणजीतला केवळ ऑटोग्राफच दिला नाही तर भारतीय कर्णधाराने त्याच्यासाठी खास मेसेजही लिहिला आहे. रोहित शर्माकडून मिळालेल्या ऑटोग्राफचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना ट्रॅफिक पोलिसांनी लिहिलंय की, 'जेव्हा टीम इंडिया गेल्या वेळी इंदूरला आली होती, तेव्हा मी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला मी भेटलो. मी त्याचा ऑटोग्राफ मागितला पण ड्युटीमुळे मी त्याच्याकडून घेऊ शकलो नाही. कॅप्टनला हे आठवलं... यावेळी निघताना त्याने टीम इंडियाच्या बस ड्रायव्हर सरांना ऑटोग्राफ आणि माझ्याबद्दलच्या भावना शब्दात लिहून दिल्या. यावेळी त्याने हा मेसेज आणि ऑटोग्राफ क्रेझी मॅन रणजीपर्यंत पोहोचवण्यास सांगितलं. कॅप्टन सर, तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. रोहित भाई, तू बेस्ट आहेस.

आज फॉर्ममध्ये येणार का रोहित शर्मा?

अफगाणिस्तानविरूद्धच्या दोन सामन्यांमध्ये रोहित शर्माला एकही रन करता आला नाही. यावेळी तब्बल वर्षभराने त्याला चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे कमबॅक करणं शक्य झालं नाही. दुसरीकडे कर्णधार म्हणून धोनीने भारताला सर्वाधिक 41 टी-20 सामने जिंकून देण्यात यश मिळवलंय. रोहितच्या नावावरही तितकेच विजय आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक सामना जिंकताच रोहित धोनीला मागे टाकणार आहे.