रोहित पोहोचला 'विराट' क्लबमध्ये!

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये रोहित शर्मा रेकॉर्ड करून आऊट झाला. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 20, 2017, 07:47 PM IST
रोहित पोहोचला 'विराट' क्लबमध्ये! title=

कटक : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये रोहित शर्मा रेकॉर्ड करून आऊट झाला. टी-20 क्रिकेटमध्ये १,५०० रन्स करणारा रोहित दुसरा भारतीय बनला आहे. ६९ मॅचमध्ये रोहित शर्मानं १५०२ रन्स बनवल्या आहेत. यामध्ये रोहितनं १२ अर्धशतकं केली आहेत. १३ बॉल्समध्ये १७ रन्स करून रोहित शर्मा आऊट झाला. 

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर १९५६ रन्स आहेत. विराटनं ५५ मॅचमध्ये १३७.८४च्या स्ट्राईक रेटनं या रन्स केल्या आहेत. विराटच्या नावावर १८ अर्धशतकंही आहेत.