IND vs WI : रोहितच्या शिव्या खायच्यात का...; शुभमनच्या चुकीवर ईशानने खडसावलं, पाहा VIDEO

Ishan Kishan Video : ईशानचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून यावेळी तो रोहितसंदर्भात ( Rohit Sharma ) गिलला सल्ला देताना दिसला. वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरु असताना आर अश्विन गोलंदाजी करत होता. यावेळी फिल्डींगसाठी उभा असलेला शुभमन गिल ( Shubman Gill ) पोझिशन चेंज करताना दिसला.

सुरभि जगदीश | Updated: Jul 13, 2023, 04:14 PM IST
IND vs WI : रोहितच्या शिव्या खायच्यात का...; शुभमनच्या चुकीवर ईशानने खडसावलं, पाहा VIDEO title=

Ishan Kishan Video : भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs W ) यांच्यामधील पहिल्या टेस्ट सामन्याला बुधवारपासून सुरुवात झालीये. टीम इंडियाच्या ( Team India ) गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली अवघ्या 150 रन्समध्ये वेस्ट इंडिजच्या सर्व फलंदाजांना तंबूत धाडलं. दरम्यान यावेळी फिल्डींग करत असताना कर्णधार रोहित शर्माचा दरारा दिसून आला आहे. यावेळी ईशान किशनचा ( Ishan Kishan ) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. 

विंडसर पार्क डोमिनिकामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. यावेळी वेस्ट इंडिजचा कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात ईशान किशनने ( Ishan Kishan ) डेब्यू करत विकेट किपिंग केली. यावेळी विकेटच्या पाठी उभा असताना इशान मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. अशातच ईशानचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून यावेळी तो रोहितसंदर्भात ( Rohit Sharma ) गिलला सल्ला देताना दिसला. 

रोहितच्या शिव्या खायच्यात का...

वेस्ट इंडिजची फलंदाजी सुरु असताना आर अश्विन गोलंदाजी करत होता. यावेळी फिल्डींगसाठी उभा असलेला शुभमन गिल ( Shubman Gill ) पोझिशन चेंज करताना दिसला. ईशान जागा बदलत असल्याचं पाहताच ईशाने किशनने ( Ishan Kishan ) त्याला चेतावणी दिली. यावेळी ईशान गिलला म्हणाला की, अरे रोहित भाईच्या शिव्या खायच्या आहेक का तो तुला पुन्हा ओरडेल. ईशानचा हा आवाज स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. 

दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विकेटमागे उभं राहून ईशान ( Ishan Kishan ) अनेकदा मजेशीर कॉमेंट्री करताना दिसतो. त्याच्या या सवयीमुळे चाहत्यांना ऋषभ पंतची आठवण होते. पंत देखील विकेटकिपींग करत असताना बऱ्याचदा मजेशीर कमेंट्री करायचा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SM (@sports_fever_.02)

विकेटकीपिंग दरम्यान, इशान किशनचे मजेदार माईक रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत. ईशान किशन यावेळी खेळाडूंच्या गोलंदाजीचं कौतुक करत होता. यादरम्यान आर अश्विनने उजव्या लेन्थ लाईनवर बॉल टाकला यावेळी ईशान किशन म्हणतो,‘कौन सी जगह ढूंढ ली भाई’

विराट आणि जयस्वाललाही खास सल्ले

विकेटकिपींग करताना विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांना योग्य फिल्डींगसाठी सल्ले दिले. ईशान किशनचं हे स्टंप माइक रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना मात्र ते फारच आवडले आहेत.