IPL मध्ये 4 वर्षानंतर या घातक खेळाडूचं कमबॅक, तुफानी खेळ दाखवण्यात माहीर

आयपीएलमध्ये आणखी एका खेळाडूच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण डोमेस्टीक क्रिकेटमध्ये तो सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच त्याला पुन्हा एकदा आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे.

Updated: Feb 13, 2022, 07:49 PM IST
IPL मध्ये 4 वर्षानंतर या घातक खेळाडूचं कमबॅक, तुफानी खेळ दाखवण्यात माहीर title=

IPL 2022 : हार्दिक पांड्याने आपल्या शानदारी खेळीने संपूर्ण जगात आपले नाव कमावले आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाने त्याला आपला कर्णधार बनवले आहे. आता त्याच्यासारखा अष्टपैलू खेळाडूचा पंजाब किंग्जने आपल्या संघात घेतला आहे. हा स्टार फलंदाज चेंडू आणि बॅटने तुफानी खेळ दाखवण्यात माहीर आहे. या खेळाडूने डोमेस्टीक अप्रतिम खेळ दाखवलाय.

डोमेस्टीक क्रिकेटचा स्टार खेळाडू ऋषी धवनला पंजाब किंग्जने 55 लाखांना विकत घेतले आहे. धवन त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि किलर बॉलिंगसाठी ओळखला जातो. मैदानाच्या चारही बाजूंना फटके मारण्याची कला त्याच्याकडे आहे. ऋषी धवनला संधी दिल्यास तो संपूर्ण जगात आपला डंका वाजवू शकतो, असे क्रिकेटपंडितांचे मत आहे. ऋषी धवन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

चार वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक

ऋषी धवनने आपल्या आयपीएल करिअरची सुरुवात पंजाब किंग्जच्या संघातून केली होती, मात्र त्यानंतर तो आयपीएलमध्ये कोणताही चमत्कार दाखवू शकला नाही. 2013 मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. तो शेवटचा आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना दिसला होता. तो 31 वर्षांचा आहे, इतक्या वयात अनेक क्रिकेटपटू टी-20 क्रिकेट खेळणे सोडून देतात. ऋषी धवनने 13 आयपीएल सामन्यात 153 धावा केल्या आहेत.

हिमाचल संघाचा कर्णधार ऋषी धवनने विजय हजारे ट्रॉफी 2020-21 हंगामात अप्रतिम खेळ दाखवला. धवनने 8 सामन्यात 458 धावा आणि 17 विकेट घेतल्या आहेत. धवनमुळेच हिमाचलच्या संघाने पहिल्यांदाच डोमेस्टीक क्रिकेटमध्ये ट्रॉफी जिंकली आहे. ऋषीने 2018-19 च्या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये 519 धावा केल्या आहेत. तो अतिशय क्लासिक फलंदाजी करतो. 

ऋषी याआधीही टीम इंडियाकडून खेळला आहे. 2016 मध्ये धवनने भारतीय संघातून पदार्पण केले होते. त्याने तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत.