ऋषभ पंत आऊट होताच गर्लफ्रेंड चर्चेत, पाहा व्हिडीओ

अरेरे! ऋषभ पंतमुळे गर्लफ्रेंड ट्रोल...स्टेडियममधील 'या' व्हिडीओची चर्चा 

Updated: May 9, 2022, 05:51 PM IST
ऋषभ पंत आऊट होताच गर्लफ्रेंड चर्चेत, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : ऋषभ पंतची कथित गर्लफ्रेंड सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी आपल्या सौंदर्यामुळे तर कधी पंतमुळे ती चर्चेत येते. चेन्नई विरुद्ध दिल्ली झालेल्या मॅचमध्ये पंतची गर्लफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

ऋषभ पंतला सपोर्ट करताना ईशा नेगी दिसत आहे. स्टेडियममध्ये ती दिसल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. पंत चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता तेव्हा ती त्याला चिअर्स करत होती.

ऋषभ पंतला स्टेडियममध्ये ईशा नेगी सपोर्ट करताना दिसली. जेव्हा पंत आऊट झाला तेव्हा ईशाचा चेहरा पडला. पंतही काही सेकंद मैदानातून बाहेर जाण्याआधी थांबला. ईशाला खूप वाईट वाटलं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले आहेत. 

ऋषभ पंत आणि ईशा नेगी गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. ईशा नेगी सोशल मीडियावर तुफान अॅक्टीव्ह असते. तिच्या वाढदिवशी ऋषभने दोघांचा फोटो शेअर करून खास शुभेच्छाही दिल्या होत्या.