IPL 2022: ऋषभ पंतने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली! पराभवामागचे सांगितले हे मोठे कारण

DC vs MI सामना: आयपीएल 2022 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सीझनच्या बाहेर फेकली गेली आहे. संघाच्या या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने मोठे वक्तव्य केले आहे.

Updated: May 22, 2022, 08:21 AM IST
IPL 2022: ऋषभ पंतने आपल्या पायावर कुऱ्हाड मारली!  पराभवामागचे सांगितले हे मोठे कारण  title=

मुंबई : DC vs MI Match: IPL 2022 : IPL 2022 चा 69 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने 5 गडी राखून सामना जिंकून दिल्लीला या सीझनमधून बाहेर काढले. दिल्लीला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची चांगली संधी होती, समोर या मोसमातील सर्वात कमकुवत संघही होता, परंतु दिल्लीच्या खेळाडूंना या संधीचा फायदा उठवता आला नाही. संघाच्या या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत याने (Rishabh Pant) पराभवामागचे मोठे कारण सांगितले.

त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा पराभव  

मुंबईकडून पाच गडी राखून पराभूत झाल्यानंतर आयपीएलमधून बाहेर पडलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला की, त्याच्या संघाला चांगली रणनीती आणि चांगल्या अंमलबजावणीची गरज आहे. सामन्यानंतर पंत म्हणाला, 'आम्ही सामन्यात बहुतांश वेळा चांगल्या स्थितीत होतो, पण त्या स्थितीत पोहोचल्यानंतर आम्ही आमची पकड ढिली केली. संपूर्ण स्पर्धेत हे घडले आहे. हा दबावाचा विषय नाही, तर एक चांगली रणनीती बनवण्याची आणि ती अधिक चांगल्या प्रकारे राबवण्याची होती. तो पुढे म्हणाला, 'संपूर्ण स्पर्धेत त्याची कमतरता होती. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत आणि पुढच्यावर्षी एक मजबूत संघ म्हणून परत येऊ.

DRS घेण्यात चूक झाली

मुंबई इंडियन्सच्या (MI) या विजयाचा हिरो होता टीम डेव्हिड. टीम डेव्हिडने 11 चेंडूत 34 धावांची शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. एकेकाळी टीम डेव्हिड क्लीन आऊट झाला होता, पण अम्पायरने त्याला आऊट दिले नाही आणि दिल्लीच्या टीमने रिव्ह्यूही घेतला नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या या चुकांवर ऋषभ पंत म्हणाला, 'मला वाटले की चेंडू बॅटला लागला होता पण वर्तुळात उभ्या असलेल्या प्रत्येकाला याची खात्री नव्हती. मी काय करु ते विचारले आणि शेवटी रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला.

संपूर्ण सामना असा रंगला

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)  याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने 7 गडी गमावून 159 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलने 43 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार ऋषभ पंत याच्या बॅटमधून 39 धावा झाल्या. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाने शेवटच्या षटकात हे लक्ष्य गाठले. मुंबई इंडियन्सकडून टीम डेव्हिडने 34 आणि इशान किशनने 48 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेव्हिसनेही 37 धावा केल्या.