ऋषभ पंतची सिक्स मारत टेस्ट करिअरची सुरुवात

ऋषभ पंतचा रेकॉर्ड

Updated: Aug 19, 2018, 02:44 PM IST
ऋषभ पंतची सिक्स मारत टेस्ट करिअरची सुरुवात title=

नॉटिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंघममध्ये सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या दिवशी भारताने आपल्या काही चुका सुधारुन चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला टीममध्ये घेतलं आहे.

विराट कोहली 97 रनवर आऊट झाल्यानंतर भारतीय फँसची पुन्हा एकदा निराशा झाली. पण ऋषभ पंतने पुन्हा एकदा चाहत्यांना खूश केलं. पंत जेव्हा बॅटींग करण्यासाठी आला तेव्हा त्य़ाच्या समोर लेग स्पिनर आदिल राशिद होता.

आदिलच्या पहिल्या बॉलवर त्याने डिफेंड केलं पण त्यानंतर जे झालं त्यावर राशिदला देखील विश्वास बसत नव्हता. त्याने राशिदच्या बॉलवर लांब सिक्स मारला. त्याच्या टेस्ट करियरमध्ये दुसऱ्या बॉलमध्ये सिक्स मारणारा पंत याने टेस्ट करियरची सुरुवात याचं सिक्स पासून केली. टेस्ट करियरमध्ये त्याने सिक्स मारुन 6 रनने सुरुवात केली. पंत टेस्ट इतिहासात सिक्स मारुन करियरची सुरुवात करणारा 12 वा खेळाडू ठरला आहे.

सगळ्यात आधी हा कारनामा ऑस्ट्रेलियाच्या एरिक फ्रीमॅनने केला होता. यानंतर कार्लिसले बेस्ट, केथ डाबेंगवा, डेल रिचर्डसन, शैफुल इस्लाम, जहूरुल इस्लाम, अल अमीन हुसैन, मार्क क्रेग, धनजंय डिसिल्वा, कॅमरुल इस्लाम, सुनील एमब्रिस आणि आता ऋषभ पंतच्या नावे हा रेकॉर्ड बनला आहे.

विराट कोहलीचं सीरीजमधलं दुसरं शतक हुकलं आहे. 97 रनवर त्याला आदिल रशीदने आऊट केलं. हे शतक झालं असतं तर त्याचं 23वं टेस्ट शतक पूर्ण झालं असतं. या इनिंगमध्ये विराटने 11 फोर मारले आहेत.