WTC Final 2023: इंडियन प्रिमिअर लिगमध्ये (IPL 2023) रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यांपैकी पहिला सामना गाजवला गुजरात टायटन्सच्या वृद्धीमान साहाने. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यामध्ये वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) लखनऊच्या गोलंदाजीची पिसं काढली. वृद्धीमानने जलद गोलंदाज असो किंवा फिरकी गोलंदाज सर्वांचीच मनसोक्त धुलाई केली. अवघ्या 20 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या वृद्धीमानने 43 चेंडूंमध्ये 81 धावांची खेळी केली. वृद्धीमानच्या या एका खेळीमुळे त्याचं नशीब पालटण्याची शक्यता सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी (WTC final) वृद्धीमान शाहाचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने करावा अशी मागणी आता चाहत्यांनी केली आहे. विशेष म्हणजे के. एल. राहुलच्या (KL Rahul) जागी वृद्धीमानला संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे.
लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातकडून शुभमन गिलबरोबर सलामीला आलेल्या वृद्धीमानने पहिल्याच षटकामध्ये मोहसीन खानला एकामागोमाग एक चौकार लगावले. त्यानंतर आवेश खानच्या गोलंदाजीवर वृद्धीमानने एक षटकार आणि चौकार लगावला. एकीकडे पॉवर प्लेमध्ये शुभमन अडखळत खेळताना दिसत होता तर दुसरीकडे वृद्धीमान मात्र बॅक फूट आणि फ्रण्ट फूटवर तुफान फटकेबाजी करताना पहायला मिळाला. पॉवर प्लेमध्येच वृद्धीमानने 6 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार लगावत संघाचा स्कोअरकार्ड बिनबाद 78 वर नेऊन ठेवला.
अवघ्या 20 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकणाऱ्या वृद्धीमानची फलंदाजी पाहून सोशल मीडियावरुन बीसीसीच्या निवड समितीने वृद्धीमान साहाचा विचार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी करावा अशी मागणी होताना दिसत आहे. दुखापतग्रस्त के. एल. राहुलच्या जागी सलामीवीर म्हणून वृद्धीमान साहाला संधी दिली जावी अशी मागणी सोशल मीडियावरुन केली जात आहे. भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांनीही सोशल मीडियावरुन अशीच मागणी केली आहे.
Saha for the #WTCFinal? #CricketTwitter
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (@doddaganesha) May 7, 2023
दोड्डा गणेश यांच्याबरोबरच सोशल मीडियावर इतरही अनेक चाहत्यांनी वृद्धीमानचा खरोखरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी विचार झाला तर भारतीय संघाला फायदाच होईल असं मत नोंदवलं आहे.
1)
There can be no replacement for KL Rahul better than Saha in the WTC final.
Saha deserv a chance #saha #WTCFinal pic.twitter.com/GqHLvqvSjP— plexus(@doc_dexa) May 7, 2023
2)
perfect replacement for kl rahul in wtc final #Saha pic.twitter.com/3FheaQ7K55
— Aryan_raj (@_rajaryann_) May 7, 2023
3)
@BCCI do you have any better option than Wriddhiman Saha as a WK Batsman for WTC final???
He is the kind of player who always keeps on working hard even knowing that he will not get selected.#WTCFinal2023 #GTvsLSG pic.twitter.com/VCMi2eMZxU
—(@Prisha__Kaur) May 7, 2023
आयपीएलमधील आरसीबीविरुद्धच्या सामन्यामध्ये फिल्डींग करताना के. एल. राहुल जखमी झाला. याच दुखापतीमुळे के. एल. राहुल उर्वरित आयपीएलमधून बाहेर पडला आहे. लखनऊच्या संघाने राहुलवर शस्त्रक्रीया करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. राहुल हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामधूनही बाहेर पडला आहे. त्यामुळेच आता भारताकडे विकेटकिपर बॅट्समन म्हणून केवळ के. एस. भारतचा पर्याय उपलब्ध असतानाच आता वृद्धीमान साहाच्या नावाची घोषणा करण्याची मागणी चाहत्यांकडून होताना दिसत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे. ओव्हलच्या मैदानात हा सामना 7 जून ते 11 जून दरम्यान खेळवला जाणार आहे.