पंतची बॅटींग पाहण्यासाठी पैसे द्यायला ही तयार - पाँटिंग

पाँटिंगने ऋषभ पंतचं केलं असं कौतुक

Updated: Jan 24, 2019, 12:19 PM IST
पंतची बॅटींग पाहण्यासाठी पैसे द्यायला ही तयार - पाँटिंग title=

मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) ने आपल्या खेळ कौशल्यातून अनेक दिग्गजांकडून कौतूकाची थाप मिळवली. यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा देखील समावेश आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या पंतची तुलना ऑस्‍ट्रेलियाचा माजी विकेटकीपर एडम ग्रिलक्रिस्ट सोबत करण्यात आली. याआधी ऑस्‍ट्रेलियाचा खेळाडू ग्‍लेन मॅक्‍सवेलने देखील पंतला खास खेळाडू असल्याचं म्हटलं आहे. पंतला मंगळवारी आयसीसीने एमर्जिंग प्‍लेयर ऑफ द ईयर घोषित केलं. सोबतच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा देखील आयसीसीने अंतिम १० मध्ये समावेश केला. पॉटिंगने म्हटलं की, पंत असा खेळाडू आहे ज्याची बॅटींग पाहण्यासाठी मी पैसे खर्च करायला देखील तयार आहे.'

पाँटिंगने म्हटलं की, महेंद्र सिंह धोनीचा टेस्टमधला ६ शतकांचा रेकॉर्ड पंत सहज मोडेल. पंतने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शानदार शतक ठोकले. आयसीसीच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, पाँटिंग म्हणतो की, "पंतमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे. तो बॉल शानदारपणे हिट करु शकतो. तो असा खेळाडू आहे जो भारतासाठी खूप टेस्ट क्रिकेट खेळू शकतो. त्याला त्याच्या विकेटकीपिंगवर काही सुधार करण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात त्याची बॅटींग आणखी चांगली होईल.'

Image result for ricky ponting zee

पाँटिंगने म्हटलं की, "आपण नेहमी धोनीबद्दल बोलत असतो. त्याचा भारतीय क्रिकेटवर प्रभाव कसा आहे. त्याने भारतासाठी खूप क्रिकेट खेळली आहे. पण तो सहाच शतक करु शकला. पण पंत धोनी पेक्षा अधिक शतक ठोकेल. आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याच्याबद्दल बोलतो. तो एडम गिलक्रिस्ट सारखा आहे. गिलक्रिस्टने ही पंतचं कौतुक केलं आहे. तो देखील त्याची बॅटींग पाहण्यासाठी पैसे द्यायला तयार आहे." 

पाँटिंग पुढे म्हणतो, 'पंत आता आपल्या करिअरची सुरुवात करतो आहे. त्यामुळे त्याला खूप काही शिकायला मिळेल. जेवढा तुम्ही विचार करता त्यापेक्षा अधिक तुम्हाला मिळतं. पण त्याने निश्चितपणे एक यशस्वी टेस्ट क्रिकेटर बनण्याची सुरुवात केली आहे. अशा खेळाडूला पाहण्यासाठी मी पैसे द्यायला ही तयार आहे.'