IPL 2022 : कॅप्टन्सी सोडल्यानंतर धोनीला टीममध्ये जागा मिळणं कठीण? अशी असेल प्लेईंग 11

नुकतंच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, कर्णधारपद सोडल्यानंतर या सिझनमध्ये धोनी खेळणार का?

Updated: Mar 25, 2022, 09:51 AM IST
IPL 2022 : कॅप्टन्सी सोडल्यानंतर धोनीला टीममध्ये जागा मिळणं कठीण? अशी असेल प्लेईंग 11 title=

मुंबई : 26 मार्चपासून म्हणजेच उद्यापासून आयपीएलचा डंका वाजणार आहे. 15 व्या सिझनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. दरम्यान नुकतंच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडलं आहे. त्यामुळे चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, कर्णधारपद सोडल्यानंतर या सिझनमध्ये धोनी खेळणार का? 

उद्या आपपीएलमधील पहिला सामना सीएसकेचा आहे. त्यामुळे सीएसके विरूद्ध कोलकाता या सामन्यासाठी चेन्नईचं प्लेईंग 11 कसं असणार आहे? प्लेईंग 11 मध्ये धोनीचा समावेश असणार का हे जाणून घेऊया.

अशी असेल ओपनिंग जोडी

गेल्या वर्षी कोलकात्याला नमवून चेन्नईने आयपीएल जिंकली होती. यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि फाफ ड्यू प्लेसिस ओपनिंगला उतरले होते. मात्र आता ओपनिंगच्या जोडीमध्ये बदल होणार असून न्यूझीलंडचा डेवोन कॉनवे ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. यानंतर नंबर 3 वर रॉबिन उथप्पा येऊ शकतो.

मिडल ऑर्डर कशी असणार

चौथ्या क्रमांकावर अंबाती रायडू उतरण्याची शक्यता आहे. या फलंदाजाने यापूर्वीही चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक मॅच-विनिंग इनिंग्स खेळल्या आहेत. त्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संधी मिळणार असून तो पाचव्या क्रमांकावर उतरणार आहे. धोनी जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. सहाव्या क्रमांकावर जाडेजा शिवम दुबेला संधी देऊ शकतो.

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये गोलंदाज राजवर्धन हुंगरगेकर यांनी यात महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे उद्याच्या सामन्यात रवींद्र जडेजा त्याला संधी देऊ शकतो. त्याचवेळी शार्दुल ठाकूरचा टीममध्ये समावेश होणार आहे. यानंतर अॅडम मिल्नेला खेळण्याची संधी मिळू शकते. 

केकेआरविरूद्ध सीएसकेची संभाव्य प्लेईंग 11

रवींद्र जडेजा (कर्णधार), महेंद्र सिंह धोनी, ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, राजवर्धन हेंगरगेकर, डेवेन ब्रावो, क्रिस जार्डन, एडम मिल्ने