आम्ही आखलेली योजना...; 6 पराभव स्विकारल्यानंतर Ravindra Jadeja संतापला!

6 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा चांगलाच संतापलेला दिसला. 

Updated: Apr 26, 2022, 09:21 AM IST
आम्ही आखलेली योजना...; 6 पराभव स्विकारल्यानंतर Ravindra Jadeja संतापला! title=

मुंबई : सोमवारी पंजाब किंग्ज विरूद्ध चेन्नई या सामन्यात पुन्हा एकदा सीएसकेला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने चेन्नईचा 11 रन्सने पराभव केला. कालच्या सामन्यात पंजाबच्या टीमने चांगला खेळ केला. दरम्यान 6 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा चांगलाच संतापलेला दिसला. 

पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करत 4 विकेट्स गमावत 187 रन्स केले. यानंतर चेन्नई फलंदाजाली उतरली असता पंजाबने 176 रन्समध्ये त्यांना रोखलं. दरम्यान सामन्यानंतर रविंद्र जडेजा म्हणाला, "आम्ही खूप चांगली सुरुवात केली होती. पण मला वाटतं, शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये 10-15 रन्स अधिक दिले. शेवटच्या ओव्हरमध्ये आम्ही जसा प्लॅन केला होता तसं करू शकलो नाही."

जडेजाने 39 बॉल्समध्ये 78 रन्सची खेळी करणाऱ्या अंबाती रायुडूचं कौतुक केलं. जडेजा म्हणाला, मला वाटतं की त्याने चांगली फलंदाजी केली. मात्र जसं की मी म्हणालो, पंजाबला आम्ही 170-175 रन्सच्या खाली रोखू इच्छित होतो. याशिवाय आमच्या फलंदाजीची सुरुवातंही काही खास झाली नाही. ज्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यास अचडण आली.

यंदाच्या आयपीएलमधील हा चेन्नईचा सहावा पराभव होता. पंजाबविरूद्धच्या पराभवामुळे चेन्नईचा प्लेऑफपर्यंतचा प्रवास कठीण झाला आहे.