बॅटींग म्हणालास ना तू? टॉसनंतर रोहित आणि जडेजामध्ये नेमकं काय झालं?

कालच्या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Updated: Apr 22, 2022, 11:26 AM IST
बॅटींग म्हणालास ना तू? टॉसनंतर रोहित आणि जडेजामध्ये नेमकं काय झालं? title=

मुंबई : मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. या सामन्यात टॉस जिंकून चेन्नईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ज्यावेळी रवींद्र जडेजाने टॉस जिंकला त्यावेळी एक गमतीशीर घटना मैदानावर घडली.

टॉस जिंकल्यानंतर रोहित शर्मा जडेजाशी काहीतरी बोलत असल्याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी रोहित जडेजाला सतत, बॅटींग म्हणालास ना तू? असं विचारत असताना कॅमेरात कैद झाला. जडेजाही यावेळी मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला. 
 
रोहित सतत त्रास देत असल्याने जडेजानेही त्याला मस्करीत, मी सांगणार नाही की मी गोलंदाजी घेतली आहे. ज्यानंतर रोहित आणि जडेजा दोघंही जोरजोरात हसत होते. जडेजा निक नाइटकडे गेला आणि त्याने प्रथम गोलंदाजी करणार असल्याचं सांगितलं. 

मुंबई इंडिन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 रन्सचं आव्हान दिलं होतं. चेन्नईकडून अंबाती रायडुने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने 30 रन्सचं योगदान दिलं. धोनीने निर्णायक क्षणी 28 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली. तर प्रिटोरियसने नाबाद 22 धावा करत धोनीला चांगली साथ दिली.

मुंबईचा यंदाच्या सिझनमधील हा 7वा पराभव होता. या पराभवानंतर मुंबईच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या आहेत.