आर अश्विनचे मुथैय्या मुरलीधरनकडून कौतुक

टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विन हा सध्याच्या घडीला जगातला सर्वश्रेष्ठ स्पिन बॉलर आहे असे गौरवोद्गार श्रीलंकेचा महान बॉलर मुथैय्या मुरलीधरन याने काढलेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 28, 2017, 11:50 PM IST
आर अश्विनचे मुथैय्या मुरलीधरनकडून कौतुक title=

मुंबई : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विन हा सध्याच्या घडीला जगातला सर्वश्रेष्ठ स्पिन बॉलर आहे असे गौरवोद्गार श्रीलंकेचा महान बॉलर मुथैय्या मुरलीधरन याने काढलेत. 

सातत्यपूर्ण कामगिरी श्रेष्ठतेची साक्ष

त्याची सातत्यपूर्ण कामगिरी श्रेष्ठतेची साक्ष देत असल्याची कौतुकाची थाप मुरलीनं अश्विनला दिलीय. टेस्टमध्ये 300 विकेट्स घेणे ही साधीसोपी गोष्ट नसल्याचंही मुरलीनं नमूद केलंय. 

लवकरच वनडे टीममध्येही कमबॅक

सध्या अश्विन भारताच्या वनडे टीममध्ये नाही. मात्र लवकरच तो वनडे टीममध्येही कमबॅक करेल आणि आपली जादू दाखवेल असा विश्वासही मुरलीनं व्यक्त केलाय. टेस्ट क्रिकेटमध्ये 800 विकेट्सचा भीमपराक्रम मुरलीनं केलाय. त्याचा हा रेकॉर्ड अश्विन तोडेल का यावरही त्यानं उत्तर दिलंय. 

तो बरेच रेकॉर्ड्स करेल 

सध्या अश्विन 31-32 वर्षाचा आहे. तो अजून किमान 3 ते 4 वर्षे खेळेल आणि फिटनेसवर लक्ष देत अशीच सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास तो बरेच रेकॉर्ड्स करेल असंही मुरलीधरननं आवर्जून नमूद केलंय.