अनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती?

टीम  इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार  सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2017, 06:01 PM IST
अनिल कुंबळेंपेक्षा रवी शास्त्रींचा पगार जास्त, पाहा किती? title=

मुंबई : टीम  इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मागणीनुसार  सहाय्यक प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मिळालेत. आता आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यापेक्षा जास्त पगाराची मागणीही पूर्ण झालेय.

रवी शास्त्री आणि त्यांच्या टीमला बीसीसीआयने पगारवाढही जाहीर केली आहे. मुख्य प्रशिक्षक या नात्याने रवी शास्त्री यांना ७.५ कोटी इतक वार्षिक मानधन मिळणार आहे. अनिल कुंबळे यांच्या तुलनेत शास्त्री यांना तब्बल १.२५ कोटी रुपये जास्त मिळणार आहेत. 

तसेच सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांना वार्षिक २.२० कोटी, तर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना वार्षिक २ कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे. 

दरम्यान, शास्त्री यांच्या मागण्या काही संपताना दिसत नाहीत. त्यांनी आणखी एक मागणी केलेय. तीही टीम इंडियासाठी सल्लागार हवाय.

बॉलिंग प्रशिक्षक म्हणून भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांची नियुक्ती शास्त्री यांच्या मागणीनंतर करण्यात आली. शास्त्री यांना मनपसंतीचा स्टाफ मिळाल्यानंतरही शास्त्रींनी आणखी एक मागणी केल्याचे पुढे येतेय.  मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची टीम इंडियाचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची इच्छा शास्त्रींनी व्यक्त केलेय.