नवी दिल्ली : अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर टीम इंडियाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची नियुक्ती झाली. मात्र, शास्त्री यांच्या मागण्या काही संपताना दिसत नाहीत. त्यांनी आणखी एक मागणी केलेय. तीही टीम इंडियासाठी सल्लागार हवाय.
बॉलिंग प्रशिक्षक म्हणून भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांची नियुक्ती शास्त्री यांच्या मागणीनंतर करण्यात आली. शास्त्री यांना मनपसंतीचा स्टाफ मिळाल्यानंतरही शास्त्रींनी आणखी एक मागणी केल्याचे पुढे येतेय. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची टीम इंडियाचा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची इच्छा शास्त्रींनी व्यक्त केलेय.
रवी शास्त्री यांनी बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना, सीईओ राहुल जोहरी, कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी आणि प्रशासक समिती सदस्य डायना एडलजी यांच्यासमवेत झालेल्या विशेष सभेमध्ये मागणी केलेय.
सचिन तेंडुलकरची नियुक्ती करताना हितसंबंधांची टक्कर होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल असं शास्त्री म्हणाले. सचिन तेंडुलकर सध्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे. याच समितीने रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुक्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे.