BCCI ने रवी शास्त्रींना दिलं इतकं मानधन

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी नेमकं किती मानधन दिलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 5, 2017, 01:46 PM IST
BCCI ने रवी शास्त्रींना दिलं इतकं मानधन title=
File Photo

नवी दिल्ली : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी नेमकं किती मानधन दिलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

बीसीसीआयने रवी शास्त्री यांना आपल्या कार्यकाळातील पहिल्या तीन महिन्यांसाठी १ कोटी २० लाख रुपयांहून अधिक मानधन दिलेलं आहे. रवी शास्त्री यांनी याच वर्षी जुलै महिन्यात मुख्य प्रशिक्षक पदाची सुत्रं स्विकारली.

१८ जुलै ते १८ ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कार्यकाळासाठी रवी शास्त्रींना १,२०,८७,१८७ रुपयांचं मानधन देण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला भारताबाहेर झालेल्या सीरिजसाठी मानधन स्वरुपात ५७ लाख ८८ हजार ३७३ रुपये देण्यात आले आहेत. तर, बीसीसीआयने रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीच्या मॅचेसची फीज क्रमश: ६९,३५,१४१ आणि ५६,७९,६४१ रुपयांचं मानधन दिलं आहे.

तीन महिन्यांमध्ये मिळालेल्या रक्कमेच्या आधारे मोजणी केली तर रवी शास्त्री यांना ४.८ कोटी रुपये वर्षाला मिळतील. हे मानधन प्रशिक्षक कुंबळेच्या तुलनेत कमी आहे. यापूर्वी रवी शास्त्री ज्यावेळी टीम इंडियाचे डायरेक्टर होते त्यावेळी त्यांना ७ ते ७.५ कोटी रुपयांचं मानधन दिलं जात होतं.