LIVE सामन्यात राशिद खानचा राडा, AFG vs SL मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

AFG vs SL,T20 World Cup : झालं असं की... राशिद खान (Rashid Khan) म्हणजे स्पिनचा नवा बादशाह, भल्या भल्या फलंदाजांना त्याच्या समोर टिकता आलं नाही. अशातच...

Updated: Nov 1, 2022, 11:20 PM IST
LIVE सामन्यात राशिद खानचा राडा, AFG vs SL मॅचमध्ये नेमकं काय घडलं? title=
Rashid Khan scolds Fazalhaq Farooqi

Rashid Khan scolds Fazalhaq Farooqi: सध्या T20 World Cup मध्ये रोमांचक सामने पहायला मिळत आहे. अफगाणिस्तानचा संघ तब्बल 10 दिवसांनी पुन्हा मैदानात उतरला. मात्र, ब्रिस्बेनमध्ये मंगळवारी श्रीलंकेकडून अफगाणिस्तानला स्पर्धेतील दुसरा पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे आता अफगाणिस्तानचं सेमीफायनल तिकीट रद्द होण्याची शक्यता आहे. अशातच आता AFG vs SL सामन्यात धक्कादायक घटना घडल्याचं पहायला मिळतंय.

नेमकं काय घडलं?

झालं असं की... राशिद खान (Rashid Khan) म्हणजे स्पिनचा नवा बादशाह, भल्या भल्या फलंदाजांना त्याच्या समोर टिकता आलं नाही. राशिद खान अफगाणिस्तानसाठी जादूची कांडी राहिली आहे. पाहिजे तेव्हा राशिदच्या हातात बॉल सोपवला की काम संपलं. अशीच घटना आज पहायला मिळाली. 8 वी ओव्हर टाकण्यासाठी राशिदला बोलावलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये राशिदने विकेट मिळवून दिली. मात्र, त्यावेळी राशिदचा वेगळा चेहरा समोर आलाय.

8 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर राशिदने मेंडिसला तंबूत पाठवलं होतं. त्यानंतर सेलिब्रेशन करताना (Rashid Khan scolds Fazalhaq Farooqi) राशिदने फझलहक फारुकीचं डोकं धरून लांब झटकलं. ही संपुर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फजलहक फारुकीने (Fazalhaq Farooqi) बॅकवर्ड पॉइंटवर मिसफिल्डिंग केली होती, ज्यामुळे रशीद खान नाराज होता. फारूक जवळ आल्यावर राशिदला ते आठवलं आणि विकेट घेतल्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करत असताना ही घटना घडली.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, श्रीलंकेविरुद्ध झालेल्या या सामन्यात (Afghanistan vs Sri Lanka) अफगाणिस्तानची फलंदाजी चांगली राहिली नाही. इब्राहिम झद्रान आणि नजीबुल्ला झद्रान यांनी छोटे डाव खेळले. मात्र, त्याचा संघाला काही फायदा झाल्याचं दिसलं नाही. 160 पर्यंत स्कोर जाईल अशी शक्यता असतानाच आता अफगाणिस्तानने ठराविक अंतरानं विकेट गमावले. त्यांना 20 षटकात 8 विकेट गमावून 144 धावा करता आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना धनंजय डी सिल्वाने (Dhananjay de Silva) वादळी पारी खेळत सामना हिसकावून घेतला.