IND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण

Team India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यापूर्वी एक वाईट बातमी समोर आली आहे. ते म्हणजे भारताच्या एका स्टार फलंदाजाने अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. या स्टार फलंदाजाच्या निवृत्तीची बातमी ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत. 

Updated: Dec 20, 2022, 11:42 AM IST
IND vs BAN सामन्यापूर्वी टेन्शन देणारी बातमी! 'हा' खेळाडू निवृत्त होणार, या निर्णयामुळे चाहतेही हैराण title=
Ranji Trophy 2022-23 Manoj Tiwary

Manoj Tiwary On His Retirement: भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला आहे. आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियमवर (Sher-e-Bangla Stadium) होणार आहे. दरम्यान या कसोटीपूर्वी एक वाईट बातमी समोर येत आहे. बंगाल रणजी संघाचा ( Bengal Ranji team) स्टार फलंदाज मनोज तिवारीने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात बंगाल संघाच्या विजयानंतर मनोज तिवारीने (Manoj Tiwary On His Retirement) सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान निवृत्तीचे संकेत दिले आहेत.  

बंगाल आणि उत्तर प्रदेश यांच्यात खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 सामन्याच्या दुसऱ्या डावात मनोज तिवारीने नाबाद 60 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे बंगालचा संघ उत्तर प्रदेशचा 6 गडी राखून पराभव करण्यात यशस्वी ठरला. दरम्यान, या देशांतर्गत हंगामानंतर अनुभवी फलंदाज मनोज तिवारीने क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. बंगालने यंदाच्या मोसमात रणजी करंडक स्पर्धेचे जेतेपद पटकावावे अशी त्याची इच्छा आहे. मनोज तिवारी सध्या बंगालचे कर्णधार आहे. कारण नियमित कर्णधार अभिमन्यू ईश्वरन सध्या टीम इंडियासोबत बांगलादेश दौऱ्यावर आहे.   

तसेच अभिमन्यू ईश्वरनच्या (Abhimanyu Iswaran) अनुपस्थितीत मनोज तिवारीला बंगाल रणजी संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट (team India) संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (rohit sharma) दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अभिमन्यू इसवरनचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. मनोज तिवारी सध्या अतिशय धोकादायक फॉर्ममध्ये धावत असून बंगालने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावावे अशी त्याची इच्छा आहे. यावेळी बंगालच्या संघाने रणजी विजेतेपद पटकावल्यास क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत मनोज तिवारीने दिले आहेत.  

वाचा : बांग्लादेशविरुद्ध कसोटीत 'या' खेळाडूला टीम इंडियात संधी नाही, कारण... 

रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या मोसमात बंगालचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. जिथे त्यांना मध्य प्रदेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला. बंगालने शेवटचे रणजी विजेतेपद 1989-90 मध्ये जिंकले होते. तेव्हापासून बंगाल संघाने 2005-6, 2006-7 आणि 2019-20 मध्ये तीन फायनल खेळल्या आहेत.

मनोज तिवारीने अलीकडेच उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात बंगाल संघाला स्वबळावर जिंकून दिले. उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात बंगाल संघाला विजयासाठी 257 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मनोज तिवारीने 60 धावांची नाबाद खेळी करत बंगाल संघाला या सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवून दिला. मनोज तिवारीच्या या विजयी खेळीत ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. मनोज तिवारीने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, जर बंगालच्या संघाने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले तर तो त्याचा शेवटचा रणजी हंगाम असेल.