बंदीनंतर पृथ्वी शॉचं जोरदार पुनरागमन

डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पृथ्वी शॉ याने दणक्यात पुनरागमन केलं आहे.

Updated: Dec 11, 2019, 05:01 PM IST
बंदीनंतर पृथ्वी शॉचं जोरदार पुनरागमन title=

बडोदा : डोपिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पृथ्वी शॉ याने दणक्यात पुनरागमन केलं आहे. रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याविरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉने द्विशतक झळकावलं आहे. १७९ बॉलमध्ये २०२ रन करुन पृथ्वी आऊट झाला. पृथ्वी शॉ़च्या खेळीमध्ये १९ फोर आणि ७ सिक्सचा समावेश होता. पहिल्या इनिंगमध्येही पृथ्वी शॉने ६२ बॉलमध्ये ६६ रन केले होते.

पृथ्वी शॉच्या द्विशतकासोबतच मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही ७० बॉलमध्ये नाबाद १०२ रन केले. पृथ्वी शॉच्या या खेळीमुळे त्याची न्यूझीलंड दौऱ्यासाठीची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या मुंबईचा पहिला डाव ४३१ रनवर संपुष्टात आला. यानंतर मुंबईच्या बॉलरनी बडोद्याला ३०७ रनवर गुंडाळलं. यामुळे मुंबईला १२४ रनची आघाडी मिळाली. दुसऱ्या इनिंगमध्ये मुंबईने ४०९/४ वर आपला डाव घोषित केला. पहिल्या इनिंगमधल्या आघाडीमुळे बडोद्याला विजयासाठी ५३४ रनचं आव्हान मिळालं आहे.

कफ सीरप घेतल्यामुळे पृथ्वी शॉची डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याच्यावर ८ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पृथ्वी शॉला क्रिकेट खेळण्यास मनाई होती. १६ मार्च २०१९ पासून ही बंदी विचारात घेण्यात आली असली, तरी तो आयपीएलमध्ये खेळला होता.