म्हणून राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली

चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये राजस्थानचा ४ विकेटनं विजय झाला.

Updated: May 12, 2018, 04:24 PM IST
म्हणून राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली title=

जयपूर : चेन्नईविरुद्धच्या रोमहर्षक मॅचमध्ये राजस्थानचा ४ विकेटनं विजय झाला. या विजयाबरोबरच राजस्थाननं प्ले ऑफला क्वालिफाय व्हायचं आव्हान अजून कायम ठेवलं आहे. ११ मॅचमध्ये ५ विजयासह राजस्थानच्या टीमकडे १० पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान सहाव्या क्रमांकावर आहे. या मॅचमध्ये चेन्नईनं पहिले बॅटिंग करून १७६ रन केले. पण राजस्थाननं हे आव्हान शेवटच्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. जॉस बटलरनं ६० बॉलमध्ये नाबाद ९५ रनची खेळी केली. बटलरच्या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. बटलरबरोबर संजू सॅमसननं २१ आणि स्टुअर्ट बिनीनं २२ रन केले. बिनीच्या १७ बॉलच्या खेळीमध्ये १ फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. बिनीची विकेट गेल्यानंतर राजस्थानची टीम पुन्हा संकटात सापडली पण कृष्णप्पा गौतमनं चार बॉलमध्ये २ सिक्स मारून १३ रन केले. शेवटच्या ओव्हरला राजस्थानला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती. बटलरनं ५ बॉलमध्येच हे आव्हान संपवलं.

राजस्थानच्या टीमची गुलाबी जर्सी

या मॅचमध्ये राजस्थानची टीम गुलाबी जर्सी घालून मैदानात उतरली होती. कॅन्सरबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी राजस्थानच्या टीमनं हा सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. या गुलाबी जर्सीमुळे राजस्थानचं नशीब मात्र चांगलंच फळफळलं आणि त्यांनी तगड्या अशा चेन्नईचा पराभव केला.

राजस्थान अजूनही शर्यतीत

चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर राजस्थाननं प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होण्याचं आव्हान अजूनही कायम ठेवलं आहे. ११ मॅचमध्ये ५ विजयासह राजस्थानच्या टीमकडे १० पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान सहाव्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होण्यासाठी राजस्थानला उरलेल्या तिन्ही मॅच जिंकाव्या लागणार आहेत. या विजयाबरोबरच राजस्थानला इतर टीमच्या कामगिरीवरही अवलंबून राहावं लागणार आहे. राजस्थानबरोबरच मुंबई आणि कोलकात्यानंही ११ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. पण नेट रनरेट चांगला असल्यामुळे मुंबई चौथ्या क्रमांकावर आणि कोलकाता पाचव्या क्रमांकावर आहे.