आयपीएल : एका उद्योगपतीचा मुलगा लावत होता बोली, दुसऱ्याचा होत होता लिलाव

आयपीएलच्या ११व्या सिझनचा लिलाव पार पडला आहे.

Updated: Jan 28, 2018, 10:32 PM IST
आयपीएल : एका उद्योगपतीचा मुलगा लावत होता बोली, दुसऱ्याचा होत होता लिलाव  title=

बंगळुरू : आयपीएलच्या ११व्या सिझनचा लिलाव पार पडला आहे. भारताचा फास्ट बॉलर जयदेव उनाडकटला राजस्थान रॉयल्सनं ११.५० कोटी रुपये देऊन विकत घेतलं. एवढी रक्कम मिळणारा जयदेव उनाडकट यंदाच्या वर्षातला पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. तर १७ वर्षांचा संदीप लैमिचाने हा आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सनं २० लाख रुपयांना विकत घेतलं.

आयपीएलमध्ये असाही योगायोग

आयपीएलच्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्ससाठी उद्योगपती मुकेश अंबानींचा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची आई नीता अंबानी बोली लावत होते. तर दुसरीकडे उद्योगपती कुमारमंगलम बिर्लांचा मुलगा आर्यमानचं नाव लिलाव होणाऱ्या खेळाडूंमध्ये होतं.

राजस्थान रॉयल्सनं लावली बोली

आर्यमान बिर्लाला राजस्थान रॉयल्सनं ३० लाख रुपयांना विकत घेतलं. आयपीएल ११च्या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनकॅप खेळाडूंच्या यादीमध्ये आर्यमानचं नाव होतं. बेस प्राईज २० लाख असणाऱ्या आर्यमानला पहिल्यावेळी कोणीच विकत घेतलं नाही. दुसऱ्यावेळा बोली लागली तेव्हा राजस्थान रॉयल्सनं ३० लाख रुपयांमध्ये आर्यमानला विकत घेतलं.

मध्य प्रदेशकडून खेळतो आर्यमान

२० वर्षांचा आर्यमान मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. आत्तापर्यंत आर्यमाननं फक्त एकच प्रथम श्रेणी मॅच खेळली आहे. या मॅचच्या दोन्ही इनिंगमिळून आर्यमाननं २२ रन्स केल्या आहेत. यामध्ये १६ रन्स हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. आर्यमान बॉलिंगही करतो.

कर्नल सी.के.नायडू ट्रॉफीमध्ये केली १५३ रन्सची खेळी

आर्यमानननं मागच्या वर्षी इंदूरमध्ये अंडर २३ सी.के.नायडू ट्रॉफीमध्ये ओडिसाविरुद्ध १५३ रन्सची धमाकेदार खेळी केली होती. आर्यमाननं मुंबईसोडून मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी खेळायचा निर्णय घेतला.