Rahul Dravid Statement : शाकिब अल हसनने बरोबर केलं की चूक? टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचं खळबळजनक विधान, म्हणतात...

Time Out Controversy : शाकिब अल हसन याने अँजेलो मॅथ्यूजविरुद्ध केलेल्या अपिलनंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी शाकिबचं समर्थन केलं आहे. त्यांनी या प्रकरणावर स्पष्ट मत मांडलं.

सौरभ तळेकर | Updated: Nov 12, 2023, 11:58 AM IST
Rahul Dravid Statement : शाकिब अल हसनने बरोबर केलं की चूक? टाईम आऊट वादावर राहुल द्रविडचं खळबळजनक विधान, म्हणतात... title=
Rahul dravid On Shakib Al Hasan Over Time Out Controversy

Rahul dravid On Shakib Al Hasan : श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला बांगलादेशविरुद्ध झालेल्या वर्ल्डकप (World Cup 2023) मधील लढतीत टाइम आउट नियमानुसार (Time Out Controversy) बाद केलं. त्यानंतर शाकिब अल हसनवर क्रिडाविश्वातून टीका झाली होती. शाकिबने खेळभावनांचा अनादर केलाय, त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी टीका त्याच्यावर होत होती, अशातच आता टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी टाईम आऊट वादावर आपलं स्पष्ट मत नोंदवलं आहे.

काय म्हणाले Rahul Dravid ?

कोणीही कुणाला दोष देऊ शकत नाही. कारण, टाईम आऊट विकेट ही खेळाच्या नियमात बसतं.  वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. आमचे स्वत:चं मन आहे, आपले विचार आहेत. आपल्याला नियमाचे तसेच पालन करावं लागेल का, जसं ते आहेत किंवा कधीकधी खिलाडूवृत्तीसाठी थोडी सूट द्यायला पाहिजे, असं स्पष्ट मत राहुल द्रविड यांनी व्यक्त केलं आहे. एमसीसीने ठरवलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी शाकिबला दोष दिला जाऊ नये, असंही राहुल द्रविड यांनी (Rahul dravid On Shakib Al Hasan) म्हटलं आहे.

मतभेद असणं ठीक आहे. काही लोक सहमत होऊ शकत नाहीत. जर कोणी नियमानुसार वागत असेल, तर तुम्ही त्याविषयी तक्रार करू शकता. कारण, प्रामाणिकपणे तो फक्त नियमाचं पालन करत आहे.  तुम्ही तो नियम लागू केला आहे. तुम्ही हे निवडता की नाही, हे पूर्णपणे तुमचा स्वत:चा निर्णय आहे, असं म्हणत राहुल द्रविड यांनी शाकिब अल हसन याच्या कृतीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

नेमकं काय झालं होतं? 

बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेचा वरिष्ठ फलंदाज मॅथ्यूज (Angelo Mathews) याला फलंदाजीत भोपळाही फोडता आला नाही. तो टाइम आऊट (Time Out Controversy) या पद्धतीने बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा बाद होणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात येण्यासाठी सज्ज होता. पण त्याच्या हेल्मेटचा पट्टा तुटला होता. त्यामुळे त्याला पुढच्या बॉलसाठी तयार राहण्यास थोडा वेळ लागला. नियमांनुसार, 2 मिनिटांच्या पुढील बॉलसाठी फलंदाजाने तयार व्हायचं असतं. मात्र, मॅथ्यूजला 2 मिनिट आणि 10 सेकंदाचा वेळ लागला अन् शाकिबने टाईम आऊटची अपिल केली.

आणखी वाचा - IPL 2024 : रचिन रविंद्र आयपीएलमध्ये कोणाकडून खेळणार? CSK की RCB? स्पष्टच म्हणाला, 'माझ्या मनात नेहमी...'

दरम्यान, शाकिब अल हसन केलं ते नैतिकदृष्ट्या बरोबर आहे की चूक? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एखाद्या खेळाडूला मैदानात येयला उशीर झाला तर त्याच्यावर टाईम आऊट नियम लागू करू नये, अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात आहे. आयपीएलच्या मंकडिंग वादानंतर आता टाईम आऊट विवाद झाल्याने वर्ल्ड कपमध्ये अधिक रोमांचक सामने पहायला मिळत आहे.