Ind Vs SL: थर्ड अंपायरने निर्णय बदलल्याने राहुल द्रविड हैराण

या सामन्यात एक क्षण असा आला होता की कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघंही हैराण झाले होते.

Updated: Feb 25, 2022, 10:37 AM IST
Ind Vs SL: थर्ड अंपायरने निर्णय बदलल्याने राहुल द्रविड हैराण title=

मुंबई : भारताने श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये पहिल्याच सामन्यात विजय मिळवलाय. श्रीलंकेला टीम इंडियाने 62 रन्सने धूळ चारली. या सामन्यात गोलंदाज संच फलंदाजांनी चांगला खेळ केला. भारताने श्रीलंकेला या सामन्यात 200 रन्सचं टार्गेट दिलं होतं जे पार करणं श्रीलंकेला कठीण गेलं. मात्र या सामन्यात एक क्षण असा आला होता की कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा दोघंही हैराण झाले होते. 

राहुल द्रविडने मारला डोक्यावर हात

गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारने पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. तर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर चरित असलंगाला अंपायनरे आऊट करार दिला. ज्यावर श्रीलंकेच्या फलंदाजाने रिव्ह्यू घेतला. ज्यानंतर त्याला नॉटआउट दिलं गेलं. रिव्यू पाहिल्यानंतर बॉल बॅटला लागून पॅडला लागत असल्याचं दिसलं. बॉल पॅडला लागल्यानंतर बराच काळा हवेत होती. यावेळेत कोणत्याही फिल्डरने तो कॅच घेतला नाही. 

अंपायरच्या निर्णयानंतर रोहित शर्मा हसू लागला तर डग आऊटमध्ये बसलेल्या कोच राहुल द्रविड यांनी डोक्यावर हात मारला.

टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

श्रीलंकेकडून चरिथ असलंकाने सर्वाधिक नाबाद 53 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त काही खेळाडूंना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यांना टीम इंडियाच्या गोलंदाजांनी वेळीच रोखलं. 

टीम इंडियाकडून वेंकटेश अय्यर आणि भुवनेश्वर कुमार या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर युजवेंद्र चहल आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी प्रत्येकी एका खेळाडूला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.