IPL गाजवणाऱ्या या खेळाडूचा आयपीएलमधील चीअर गर्ल सोबत विवाह

'या' क्रिकेटरच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Updated: Sep 13, 2022, 10:56 PM IST
IPL गाजवणाऱ्या या खेळाडूचा आयपीएलमधील चीअर गर्ल सोबत विवाह title=

Quinton De Kock : भारतीय क्रिकेट टीममधील अनेक खेळाडूंच्या पत्नी बॉलिवूड तारका आहेत. कोणाचं सूत कुठे जुळेल काही सांगता येत नाही. असाच एक धाकड प्लेअर आहे ज्याची प्रेमकहानी खूप इंटरेस्टिंग आहे. IPL मध्ये चीअर गर्ल असणाऱ्या तरूणीला पाहताच खेळाडूची विकेट पडली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून  दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक आहे. त्याच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

क्विंटन डी कॉकची पत्नी साशा हार्ली चीअर गर्ल आहे. साशा हार्लीने आयपीएलमध्ये काम केलं आहे. क्विंटन डी कॉक आणि साशा हार्ली यांची पहिली भेट आयपीएलमधील सामन्यादरम्यान झाली होती. 2012 मध्ये गुजरात लायन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला होता. या सामन्यानंतरच क्विंटन डी कॉकने साशा हार्लीला पहिल्यांदा पाहिलं होतं. 

लवकरच दोघे खूप चांगले मित्र बनले त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर दोघांनी लग्न केलं. साशा हार्ली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटोही चाहत्यांना खूप आवडतात. साशाला प्रवासाची आवड आहे. साशा हार्ली मैदानावर अनेक क्विंटन डी कॉकसाठी चीअर करताना दिसली आहे.

दरम्यान, साशा आणि डी कॉकला क्विंटन यांना यावर्षी कन्याप्राप्ती झाली. डी कॉकने त्याच्या मुलीचं नाव कियारा (Kiara) ठेवलं आहे. मुंबई इंडिअन्सने मागील सीझननंतर डी कॉकला वगळलं होतं. त्यानंतर डी कॉकला लखनऊ सुपरजायंट्सने आपल्या ताफ्यात सामील केलं होतं.