Pro Kabaddi League | यू मुम्बाची विजयी सलामी, बंगळुरु बुल्सवर 46-30 ने दणदणीत विजय

प्रो कबड्डी लीग चॅम्पियन (Pro Kabaddi League) राहिलेल्या यू मुम्बाने 8 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे.

Updated: Dec 22, 2021, 10:46 PM IST
Pro Kabaddi League | यू मुम्बाची विजयी सलामी, बंगळुरु बुल्सवर 46-30 ने दणदणीत विजय title=

बंगंळुरु : प्रो कबड्डी लीग चॅम्पियन (Pro Kabaddi League) राहिलेल्या यू मुम्बाने 8 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. यू मुम्बाने बंगळुरु बुल्सवर (U Mumba vs Bengaluru Bulls) 46-30 अशा एकतर्फी फरकाने दणदणीत विजय मिळवला. मुंबईच्या खेळाडूने धमाकेदार कामगिरी केली. (Pro Kabaddi League season 8 1st match u mumba beat Bengaluru Bulls by  46-30)

या सामन्यात यू मुम्बाचा रेडर अभिषेक सिंहने सर्वाधिक पॉइंट्स मिळवून दिले. अभिषेकने 19 पॉइंट्स मिळवले. तर बंगळुरुचा कर्णधार पवन सहरावतने 12 पॉइंट्सची कमाई केली. 

यू मुम्बाने पहिल्या सत्रात 24 तर बंगळुरुने 17 पॉइंट्स मिळवले. तर दुसऱ्या सत्रात यू मुम्बा आणि बंगळुरुला अनुक्रमे 22 आणि 13 पॉइंट्स मिळवण्यात यश आलं.     

पहिलं सत्रात धमाकेदार कामगिरी 

या सामन्यातील पहिल्या सत्रात दोन्ही संघानी शानदार कामगिरी केली. बंगळुरुने रेडद्वारे 16 आणि टॅकलद्वारे 1 पॉइंट् मिळवला. तर मुम्बाने रेडच्या मदतीने 19 आणि टॅकलच्या माध्यमातून 4 गुणांची कमाई केली. 

मुम्बाने ऑलआऊट केल्याने 2 पॉइंट्स मिळाले. तर दुसऱ्या सत्रात 4 गुण ऑलआऊट केल्याने मिळाले.तर दुसऱ्या सत्रात रेडमुळे दोन्ही संघांनी प्रत्येकी 11 पॉइंट्स पटकावले. मात्र टॅकलमुळे दुसऱ्या सत्रात मुम्बाने बंगळुरुच्या तुलनेत 7 पॉइंट्स मिळवले. मुंबाने टॅकलद्वारे 9 आणि बंगळुरुने 2 गुण मिळवले.    

यू मुम्बा या स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. यू मुम्बाने आतापर्यंत 6 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. यू मुम्बाने 2015 मध्ये अखेरचं विजेतेपद पटकावलं होतं.  

मुम्बाने आतापर्यंत एकूण 131 सामने खेळले आहेत. त्यापैकी 81 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 42 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर 8 सामने अनिर्णित राहिले आहेत.