मुंबई : भारतीय बॅट्समॅन पृथ्वी शॉला एकेकाळी भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले जायचे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अलीकडील त्याची कामगिरी खूप निराशाजनक होती. या कारणामुळे त्याला भारतीय संघातूनही बाहेर करण्यात आले. ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याने पहिल्यादा बॅटींग केली, परंतु तो चांगले प्रदर्शन करु शकला नाही. भारतीय संघातून काढल्यानंतर शॉने विजय हजारे ट्रॉफीमध्ये जोरदार बॅटींग केली आणि आयपीएल सीझन14 च्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्लला जिंकवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली.
दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर शॉ म्हणाला की, तो सध्या भारतीय संघात कमबॅक करण्याचा विचार करत नाही. त्याने हे स्वीकारले आहे की, त्याच्या बॅटींगमध्ये काही त्रुटी आहेत, ज्यावर तो काम करत आहे. त्या त्रुटी सुधारण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे देखील त्याने कबूल केले. शॉने चेन्नई विरुद्ध 38 बॅालमध्ये 72 रनांची तुफानी खेळी खेळली. यामध्ये त्याने 3 सिक्स आणि 9 चौकार मारले आहेत. विजय हजारे ट्रॉफीमध्येही शॅाने 800 हून अधिक रन्स केले आहेत.
सामना संपल्यानंतर शॉ म्हणाला, "मी सध्या भारतीय संघाबद्दल फारसा विचार करत नाही कारण, संघातून काढून टाकणे माझ्यासाठी खरोखरच निराशाजनक होते. माझ्या बॅटींगमध्ये काही त्रुटी आहेत, हे मी स्वीकारले आहे आणि त्यावर मी काम करत आहे. या गोष्टीसाठी मी काही करणं देणार नाही."
आपल्या कमबॅक बद्दल पृथ्वी शॉ म्हणाली, "आम्ही जो प्लॅन बनवला होता तो आम्ही अंमलात आणला. ऑस्ट्रेलिया दौर्यानंतर मी प्रवीण (आमरे) सरांकडे गेलो. माझ्या बॅटींगची चर्चा केली आणि त्यानंतर घरातील सामने खेळले ज्याचा मला फायदा झाला. मी परत येऊ शकलो याचा मला आनंद आहे. माझ्या फलंदाजीत ज्या काही त्रुटी आहे, मी त्यावर कार्य करत आहे."