IPL 2021 : "गुरु vs चेला'', स्टंप माईक नक्की ऎका" असे रवी शास्त्री का म्हणाले?

 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेला हा सामना 'गुरु विरुद्ध चेला’ म्हणून ओळखला गेला आहे.

Updated: Apr 11, 2021, 07:01 PM IST
IPL 2021 :  "गुरु vs चेला'', स्टंप माईक नक्की ऎका" असे रवी शास्त्री का म्हणाले? title=

मुंबई : जगातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टी -20 लीगमधील आयपीएलचा 14 वं सत्र सुरू झाला आहे. हंगामाचा दुसरा सामना शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या वानखडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटलमध्ये झाला. दिल्लीची कमांड आता युवा खेळाडू ऋषभ पंतच्या हातात आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी झालेला हा सामना 'गुरु विरुद्ध चेला’ म्हणून ओळखला गेला आहे. यामध्ये गुरु म्हणजेच धोनी, तर चेला म्हणजे पंतला बोलले गेले आहे.

टीम इंडियाचे कोच रवी शास्त्रीही या सामन्याबद्दल उत्सुक खूप उत्सूक होते. त्यांनी मॅचच्या आधी सोशल मीडियावर मजेदार पद्धतीने ट्वीट केले. त्यांनी धोनी आणि पंत यांचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये असे लिहिले- "गुरु vs चेला, आज खूप मजा येईल. स्टंप माईक नक्की ऎका." शास्त्री यांनी हॅशटॅगमध्ये धोनी रिटर्न्स आणि पंत लिहिले आहे.

आयपीएलचा 14 सीझनच्या शेवटी दिल्लीचा कर्णधार बदलण्यात आला आहे. खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला यावर्षी आयपीएलमध्ये सहभागी होता आले नाही आणि त्यामुळे पंतला दिल्लीचे कर्णधारपद मिळाले आहे. संघात शिखर धवन, रविचंद्रन अश्विन आणि स्टीव्ह स्मिथ यासारखे अनुभवी खेळाडू असले तरी पंतसारख्या तरूण खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय फ्रॅंचायझीने घेतला आहे.

पंतच्या कर्णधारपदाबद्दल शास्त्री म्हणाले, "कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी पंत कसा घेतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तो एक चांगला बॅट्समॅन आहे आणि कर्णधारपदाची जबाबदारी घेऊन तो स्वत: ला कसे तयार करतो हे बघने महत्त्वाचे ठरेल."

ऋषभ पंतने सामन्यानंतर एक वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये तो असे सांगत आहे की, त्याला कधी ही काही वाटले की, तो लगेचचं धोनीकडे जातो. कारण धोनीकडे सगळ्या आजारांवर उपाय आहे. ऋषभच्या या वक्तव्यामुळे हे तर निश्चितच झालं की, तो धोनीला आपला गुरु मानतो आणि त्यामुळेच सगळे क्रिकेट चाहाते 'गुरु vs चेला' मॅच पाहाण्यास उत्सुक होते.