मुंबई : अंडर १९ संघाचा कर्णधार पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक मारलीये.
वर्ल्डकपमधील भारताची आतापर्यंतची कामगिरी दमदार राहिलीये. पृथ्वी शॉने देखील सर्वच सामन्यांत चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. आज सेमीफायनलमध्ये भारताने पाकिस्तानला तब्बल २०३ धावांनी हरवत फायनलमध्ये प्रवेश केला.
पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारताने ही किमया साधली. यावेळी या विजयाबद्दल पृथ्वी शॉच्या वडिलांना विचारले असता ते म्हणाले, मी केवळ एका बापाचे जे कर्तव्य असते ते केले मात्र खरी मेहनत ही त्याचीच आहे. प्रत्येक क्रिकेटरचे स्वप्न असते भारताला वर्ल्डकप जिंकून द्यावे. त्यामुळे फायनलमध्येही भारतीय संघ चांगली कामगिरी करतील. राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन शॉला अतिशय मोलाचे ठरले. नेतृत्वगुण तो शिकतोय.
भारताचा फायनल मुकाबला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी रंगणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारत वर्ल्डकप उंचावेल असा विश्वास पृथ्वी शॉच्या वडिलांनी व्यक्त केलाय.