मुंबई: T20 World Cup स्पर्धा हळू हळू जवळ येत आहे. सध्या टीम इंडियाची A टीम इंग्लंड दौऱ्यावर तर B टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. हे दोन्ही दौऱे आटपून आयपीएल आणि त्यानंतर टी 20 वर्ल्ड़ कप सामना असं नियोजन आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या ओपनिंगला हिटमॅनची साथ कोण देणार असा प्रश्न आता पडला आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी हिटमॅनची साथ के एल राहुल किंवा धवन साथ देण्याची शक्यता असतानाच आता आणखी एका नावाची चर्चा सुरू झाली आहे. रोहित शर्माची ओपनिंगसाठी जबाबदारी आणखी एक फलंदाजावर सोपवण्यात येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मासोबत ओपनिंगला टीम इंडियाकडून मैदानात के एल राहुल उतरण्याची शक्यता आहे. परंतु याशिवाय अजून 2 पर्याय टीम इंडियाकडे आहेत. शिखर धवन आणि दुसरा म्हणजे पृथ्वी शॉ.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं टी 20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा ओपनिंगला उतरणार असं सांगितलं आहे. याच वेळी ज्येष्ठ फलंदाज आकाश चोपडा यांनी पृथ्वी शॉ देखील ओपनिंगला उतरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मी रोहित सोबत शॉची निवड करेन असंही त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर सांगितलं.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वी पहिल्यांदा फ्लॉप ठरला आणि त्यांनंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मात्र विजय हजारे आणि मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत पुन्हा कमबॅक केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याने सचिन तेंडुलकरची भेट घेऊन कानमंत्र घेतला आणि त्यामुळे त्याची कामगिरी पुन्हा एकदा अव्वल ठरली.
पृथ्वी शॉची निवड श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. तर दुसरीकडे शुभमन गिलला दुखापत झाल्यानं शॉला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. शॉच्या आताच्या कामगिरीकडेही BCCI आणि सर्व चाहत्यांचं लक्ष आहे.
इंग्लंड दौऱ्यावर असलेला शुबमनला सरावादरम्यान दुखापत झाली. त्याला नक्की कोणत्या भागाला दुखापत झाली आहे, हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण या दुखापतीमुळे त्याला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले आहे. यावरुन शुबमनला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची म्हटलं जात आहे.
शुभमनच्या दुखापतीमुळे पृथ्वीच्या इंग्लंड दौऱ्यासाठी आशा पल्लवित झाल्यात. पृथ्वीला इंग्लंडला बोलावून घेण्याबाबत बीसीसीआय सकारात्मक असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पृथ्वीला इंग्लंडवरुन बोलावणं येतं की श्रीलंका दौऱ्यातच खेळावं लागतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.