Pakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! जखमी शादाबला न्यायला स्ट्रेचर सुद्धा नाही, पाहा Video

Shadab Khan Injured :  शादाब खान हा पाकिस्तानकडून नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप देखील खेळला आहे. तो संघाचा व्हाईस कॅप्टन होता. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan Cricket)  शादाब खानची देखील कामगिरी सुमार झाली होती.  

सौरभ तळेकर | Updated: Dec 5, 2023, 03:42 PM IST
Pakistan Cricket : याला म्हणतात गरिबी! जखमी शादाबला न्यायला स्ट्रेचर सुद्धा नाही, पाहा Video title=
Poverty of Pakistan Cricket Not Found To Carry Injured Shadab Khan Watch Viral Video

Shadab Khan Viral Video : पाकिस्तान क्रिकेटमध्ये (Pakistan Cricket) सध्या मोठा उफटफेर होताना पहायला मिळतोय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सध्या पैश्यांची (Poverty Of PCB)  कमरता सतत जाणवू लागलीये. आयसीसीच्या पैश्यांवर सध्या पीसीबीचं कामकाज सुरू आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची खिल्ली उडवली जात असल्याचं पहायला मिळतंय. अशातच  सध्या एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून या व्हिडीओच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गरिबीचा परिचय होताना दिसतोय. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खानचा (Shadab Khan) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये पाकिस्तानचे खेळाडू मजुरासारखे स्वत:चं सामान वाहताना आणि गाडीमध्ये भरताना दिसत होते. तर त्यांच्या स्वागतासाठी कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता शादाब खान (Shadab Khan Injured) याला चक्क स्ट्रेचर नसल्याने खांद्यावर उचलून घेऊन जात असल्याचं पहायला मिळतंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकड्यांना ट्रोल केलं जात असल्याचं पहायला मिळतंय.

शादाबला काय झालं?

रविवारी नॅशनल टी-ट्वेंटी कपमध्ये रावळपिंडी आणि सियालकोट यांच्यात सामना खेळवला गेला होता. या सामन्यात फिल्डिंग दरम्यान शादाब जखमी झाला. त्यावेळी तो दुखापतीमुळे त्रासलेला दिसून आला. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. शादाबच्या घोट्याला दुखापत झाल्याची माहिती पीसीबीने दिली असून त्याची दुखापत फारसी गंभीर नसल्याचं देखील समोर आलं आहे. 

दरम्यान, शादाब खान हा पाकिस्तानकडून नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप देखील खेळला आहे. तो संघाचा व्हाईस कॅप्टन होता. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत शादाब खानची देखील कामगिरी सुमार झाली होती.  त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला आराम करण्यास सांगितलं गेलंय.