मुंबई : कर्नाटकचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवालची बॅट ज्याप्रकारे तळपतेय त्यानंतर टीम इंडियाच्या निवड समितीवर वारंवार सवाल उठवले जातायत. मयंकने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केलीये.
आधी रणजीच्या सत्रात त्याने ७ सामन्यांत १०२च्या सरासरीने ६१३ धावा केल्या. यानंतर मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ९ सामन्यांमत १२८च्या सरासरीने २५८ धावा केल्या. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १००च्या सरासरीने ७२३ धावा केल्या.
मयंक इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याला स्थान देण्यात न आल्याने निवडसमितीवर प्रश्न उपस्थित केले जातायत.
राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले, सध्याच्या निवड समितीचे लक्ष्य पुरेशी बेंच स्ट्रेंथ तयार करणे आणि त्या दिशेने वाटचाल सुरु आहे. सध्याच्या सत्रात सर्वाधिक २१४१ धावा करणाऱ्या मयंकला राष्ट्रीय संघात न घेण्याबाबत बोलताना ते म्हणाले, आमची समिती प्रत्येक खेळाडूशी बातचीत करते. मी मयंकशी बोललोय आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावर तो निवडीसाठीच्या रांगेत आहे.
आतापर्यंत ए लिस्ट टूर्नामेंटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने २००३मध्ये सीडब्ल्यूसी टूर्नामेंट ६७३ धावा केल्या होत्या. २०१८मध्ये या सीझनमध्ये मयंक अग्रवालने या स्पर्धेत ७२३ धावा केल्या.