India vs Australia Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. अहमदाबादमध्ये होणारा हा सामना या सिरीजचा शेवटचा सामना असणार आहे. मुख्य म्हणजे, टीम इंडियाने (Team India) 4 सामन्यांच्या या सिरीजमधील 2 सामने जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तर चौथ्या सामन्यात एक मोठी गोष्ट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) या सामन्याच्या टॉसवेळी नाणं उडवताना दिसणार आहेत.
चौथ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान Anthony Albanese हे उपस्थित असणार आहेत. अहमदाबाद स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यासाठी पंतप्रधान मोदी यांची पहिल्यांदाच उपस्थिती असणार आहे. त्यांच्या नावावरून या स्टेडियमचं नाव देण्यात आलं आहे. याशिवाय ते चौथ्या टेस्टसाठी होणाऱ्या टॉस दरम्यान देखील उपस्थित राहणार आहे.
तिसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवामुळे फायनल गाठणं आता खडतर झालं आहे. मात्र यामध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे, टीम इंडियाकडे फायनल गाठण्यासाठी एक आशा आहे. कारण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अजून चौथा सामना होणं बाकी आहे. WTC तिकीट मिळवण्यासाठी, ऑस्ट्रेलियाविरूद्धची चौथी टेस्ट जिंकावी लागणार आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून टीम इंडिया 2-1 अशी आघाडीवर आहे. मात्र तिसऱ्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याचं स्वप्न भंगलं जाऊ शकतं. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या टीमने या विजयासह फायनलमध्ये स्थान पक्कं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात आता 68.52 पॉईंट्स झाले आहेत.
मात्र बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथी टेस्ट ड्रॉ झाली तर भारताला श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या टेस्ट सिरीजच्या निर्णयावर अवलंबून रहावं लागणार आहे. जर न्यूझीलंडने ही सिरीज जिंकली किंवा ड्रॉ केली तर भारताला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे.