PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख!

Pro Kabaddi season 10 auction : पवन सेहरावतला तेलगू टायटन्सने (Telugu Titans) खरेदी केलंय. 2.60 कोटी किंमत मोजून विकला जाणारा तो आत्तापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरलाय.

Updated: Oct 9, 2023, 11:38 PM IST
PKL Auction 2023 : ऑक्शनमध्ये तेलगू टायटन्सने मारली बाजी; 'या' खेळाडूसाठी मोजले तब्बल 2 कोटी 60 लाख! title=

Most expensive player in PKL Auction : प्रो कबड्डी लीग 2023 च्या 10 व्या सिझनच्या (Pro Kabaddi season) लिलावाला सुरूवात झाली आहे. 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी हा लिलाव मुंबईत (Mumbai News) पार पडतोय. या लिलावापूर्वी अनेक फ्रँचायझींनी त्यांचे स्टार खेळाडू कायम ठेवले आहेत. त्याचबरोबर अनेक खेळाडूंना सोडण्यात आले आहे. यावेळी प्रो कबड्डी लीगमध्ये एकूण 400 खेळाडूंची बोली लावण्यात येतीये. अशातच आता लिलावाच्या पहिल्या दिवशी तेलगू टायटन्सने (Telugu Titans) बाजी मारल्याचं पहायला मिळतंय.

पहिल्या दिवशी तेलगू टायटन्सने बाजी मारली. पवन सेहरावतला तेलगू टायटन्सने (Puneri Paltan) खरेदी केलंय. 2.60 कोटी किंमत मोजून विकला जाणारा तो सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. तर मोहम्मदरेझा शादलौई चियानेहला पुणेरी पलटणने खरेदी केलंय. 2.35 कोटी किंमत मोजून त्याला संघात सामील करण्यात आलं आहे. त्याचबरोबर फाझेल अत्राचली याला गुजरात टायटन्सने 1.60 कोटीमध्ये खरेदी केलंय. पहिल्या दिवशीच्या ऑक्शननंतर आता दुसऱ्या दिवशी देखील लिलाव पार पडणार आहे. त्यावर देखील सर्वांचं लक्ष असेल.

यूपी योद्धाने प्रदीप नरवालला कायम ठेवलं आहे. प्रो कबड्डी लीग 2023 च्या लिलावापूर्वी दबंग दिल्लीने आपला स्टार खेळाडू नवीन कुमारला कायम ठेवलं आहे. बेंगळुरू बुल्सने भरत हुडाला कायम ठेवलंय. तर जयपूर पिंक पँथर्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या अर्जुन देशवालला यावेळीही संघात कायम ठेवलंय. त्याचबरोबर सुनील कुमारला देखील रिटेन केलंय.