एकदम कडकsss !! पेशावरच्या सॅम अयुबचा सिक्स पाहून पाकिस्तानी चकित, बाबरच्या डोक्यात मुंग्या; पाहा Video

Pakistan Super League : पेशावरचा सलामीवीर फलंदाज सॅम अयुब (Saim Ayub) याने असा काही शॉट मारलाय की, तुम्हीही तोंडभरून कौतूक कराल.

सौरभ तळेकर | Updated: Feb 28, 2024, 11:36 PM IST
एकदम कडकsss !! पेशावरच्या सॅम अयुबचा सिक्स पाहून पाकिस्तानी चकित, बाबरच्या डोक्यात मुंग्या; पाहा Video title=
PSL 2024, PSZ vs ISU, Saim Ayub

PSL 2024, PSZ vs ISU : जगात टी-ट्वेंटी लीगचं पेव फुटलं आहे. क्रिकेटच्या लांब लचक कसोटीपासून आता टी-ट्वेंटी क्रिकेटपर्यंतचा प्रवास झालाय. बदल्या खेळामुळे आता फलंदाजांची नवी फळी तयार होताना दिसते. ज्यामध्ये आक्रमक माऱ्याला पेलणारे गोलंदाज देखील आडकाढ्या घेऊन मैदानात ठाव मांडून उभे असल्याचं दिसून येतं. टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये नवी आक्रमक दाहकता निर्माण झालेले खेळाडू जुन्या खेळाडूंना धारेवर देखील धरतात. भारतात खेळवल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये ही गोष्ट प्रखरतेने दिसून येते. अशातच आता गरिबांची लीग म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये देखील नवे खेळाडू तयार होताना दिसत आहेत. पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड आणि बाबर आझमचा संघ पेशावर जाल्मी यांच्यात खेळल्या गेलेल्या अशीच काहीशी झलक पाहायला मिळाली.

क्रिकेट पाहून मुरलेल्या चाहत्याला चौकार आणि षटकाराचा पाक आता पचत नाही. कोणीही कितीही फोर अन् छकडे मारले तरी चेहऱ्यावर आनंदाचा मुरंबा देखील पहायला मिळणार नाही. पण क्रिकेटमध्ये असे काही इनिंग असतात किंवा ज्यामुळे क्रिकेट पाहण्यास पुन्हा उत्साह संचारतो. अशातच पाकिस्तान सुपर लीगमधील एका सिक्सने सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेतलं. पेशावरचा सलामीवीर फलंदाज सॅम अयुब याने असा काही शॉट मारलाय की, तुम्हीही तोंडभरून कौतूक कराल.

पाकिस्तानसाठी एक कसोटी सामना खेळलेला लेफ्टी सॅम अयुब अयुब कर्णधार बाबरसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला. सॅम आणि बाबरने मिळून पेशावरला वेगवान सुरुवात करुन देण्याचा विडा उचलला होता. त्यावेळी, लेफ्टी टायमल मिल्स पाचव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याचा पहिलाच चेंडू लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या दिशेने टाकला होता. मात्र, त्या बॉलवर सॅमने नो-लूक फ्लिक-स्कूप शॉट खेळला अन् प्रेक्षकांना जागेवर उठण्यासाठी भाग पाडलं.

पाहा Video

सॅमचा शॉट इतका अद्भूत होता की, नॉन स्टाईकवर उभा असलेला बाबर आझम देखील लॉग लेगच्या दिशेने पाहत राहिला. शॉट पाहिल्यानंतर बाबरचं तोंड देखील उघडंच्या उघडंच राहिलं. बाबरच काय तर अंपायने देखील तोंडात बोट घातलं. तर फिल्डर देखील सैरभैर झाल्याचं दिसून आलं. आयपीएलमध्ये रिंकी सिंगच्या बॅटमधून असा शॉट पहायला मिळाला होता.