वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, 'या' दिग्गज खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती!

Pakistani Cricketer retire :  बाबर आझम याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहीन आणि शान मसूद यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील मोठे वाद सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने (Imad Wasim has announced his retirement) तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Nov 24, 2023, 09:33 PM IST
वर्ल्ड कपमधील पराभवानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ, 'या' दिग्गज खेळाडूने घेतली तडकाफडकी निवृत्ती! title=
Imad Wasim retirement

Imad Wasim has announced his retirement : वर्ल्ड कप 2023 मधील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये (PCB) खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अनेक खेळाडूंचा पत्ता कट झाला असून आता पीसीबीमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. बाबर आझम याने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शाहीन आणि शान मसूद यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात देखील मोठे वाद सुरू आहेत. अशातच आता पाकिस्तानच्या ऑलराऊंडरने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानचा अनुभवी ऑलराऊंडर इमाद वसीम (Imad Wasim) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

काय म्हणाला Imad Wasim ?

अलीकडच्या काही दिवसांत मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल खूप विचार करत आहे आणि मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याची हीच योग्य वेळ आहे. मी पीसीबीचे गेल्या अनेक वर्षांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छितो... पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे ही खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये माझे 121 सामने हे एक स्वप्न पूर्ण झाले. नवीन प्रशिक्षक आणि नेतृत्वाच्या आगमनासह पाकिस्तान क्रिकेटसाठी हा एक रोमांचक काळ आहे. प्रत्येक यशासाठी मी सर्वांचा सहभाग घेतो आणि मी संघाची उत्कृष्ट कामगिरी पाहण्यास उत्सुक आहे. 

मला नेहमीच अशा उत्कटतेने पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानच्या चाहत्यांचे आभार. माझे कुटुंब आणि मित्रांचे अंतिम आभार ज्यांनी मला सर्वोच्च स्तरावर पोहोचण्यात मदत केली आहे. मी आता आंतरराष्ट्रीय स्तरापासून दूर राहून माझ्या खेळाच्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यावर लक्ष केंद्रित करण्यास उत्सुक आहे, अशी उच्छा देखील त्याने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा - IPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी 'या' तीन खेळाडूंचं नाव चर्चेत

दरम्यान, 34 वर्षीय यूकेमध्ये जन्मलेल्या या क्रिकेटपटूने मे 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 121 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलंय. त्याने 1472 धावा केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 109 विकेट घेतल्या आणि एप्रिल 2023 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी-ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानकडून शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याला पुरेशी संधी मिळाली नाही.  आता आगामी अबू धाबी टी 10 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी पीसीबीकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) मागतल्याची माहिती मिळते. त्याला परदेशी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मिळण्याची शक्यता असून आणखी काही वर्षे तो फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे.